घरदेश-विदेशCrime News : मुलानेच केली आईची हत्या, कारण...

Crime News : मुलानेच केली आईची हत्या, कारण…

Subscribe

कर्नाटक : मुलानेच आपपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कर्नाटक येथील मुलबागल या ठिकाणी घडली आहे. शुक्रवारी मुलबागल या ठिकाणी घडली. आईने नाश्त दिला नाही म्हणून अल्पवीयन मुलाने आईची हत्या केली. नाश्ता दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलाने आईची हत्या केली. त्यानंतर तो पोलीस ठाण्यात गेला आणि पोलिसांना केलेल्या कृत्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मुलगा शाळेत जाण्यासाठी तयारी करत असताना आईला नाश्ता देण्यास सांगितलं. आईने नाश्ता दिला नाही म्हणून मुलाला राग आला. राग अनावर झाल्यामुळे त्याने रागाच्या भरात आईची हत्या केली. त्यानंतर पोलिसांना जाऊन सगळा प्रकार सांगितला. आईचा राग आल्याने मुलाने आईच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. त्यानंतर त्याने पोलिसांकडे जाऊन आपला गुन्हा दाखल केला. या घटनेत आईचा मृत्यू झाला.

- Advertisement -

 

ही घटना शुक्रवारी कर्नाटकमधील मुलबागल या ठिकाणी घडली. या अल्पवीयन मुलाने आपला जबाब नोंदवला आहे. एक वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आईने नाश्ता देण्यास नकार दिला. मुलगा खूपच चिडला, त्यानंतर त्याने लोखंडी रॉडने त्याच्या आईच्या डोक्यात वार केला. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर अल्पवयीन मुलाने पोलीस ठाण्यात आपला गुन्हा दाखल केला. या मुलाची चौकशी करण्यात येते आहे. तसंच या हत्येमागे फक्त राग होता की आणखीही काही कारण होत का याचा तपास सध्या सुरू आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -