दररोजच्या धावपळीत सकाळचा नाश्ता काय करावा हा सर्वच गृहिणींना प्रश्न सतावत असतो. त्यात दररोजचे कांदे पोहे, गोडाचा शिरा आणि उपमा हे देखील खाऊन सतत कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी वेगळे खाण्याची इच्छा होते. अशावेळी रव्याचे ‘गोड अप्पे’ ही रेसिपी नक्की ट्राय करुन पहा.
साहित्य :
- 1 वाटी रवा
- 1/4 वाटी गुळ
- 1/2 वाटी ओले खोबरे
- 1/4 चमचा पिवळा रंग
- 1/4 वाटी काजूचे तुकडे
- 1/2 वाटी साजूक तूप
- मीठ चिमूटभर
- 1/4 चमचा वेलची पूड
कृती :
- Advertisement -
- सर्वप्रथम रवा भाजून घ्यावा. त्यानंतर 1 वाटी पाण्यात गुळ विरघळवून घ्यावा.
- त्यात रवा गरम असतानाच टाकावा.
- ओले खोबरे किसून त्यात एकजीव करावे.
- बाकीचे सर्व साहित्य टाकून एकत्र करून घ्यावे.
- हे मिश्रण 1 तास झाकून ठेवावे. त्यानंतर अप्पे पात्र गरम करून त्यात तूप सोडून मिश्रण भरावे.
- मिश्रण भांड्यात भरल्यानंतर झाकण ठेऊन 5 मिनिटे मंद गॅसवर ठेवावे.
- त्यानंतर झाकण काढून चमच्याने अलगद उलटवून घ्यावे.
- परत थोडेसे तूप सोडून झाकण न ठेवताच 3-4 मिनिटे होऊ द्यावे. त्यानंतर हे अप्पे काढून खायला देताना त्यावर थोडेसे तूप सोडावे.
हेही वाचा :
Recipe : नाश्त्यामध्ये बनवा वाटाणा-पोह्याचे कटलेट
- Advertisement -
- Advertisement -