पावसाळा असो किंवा उन्हाळा कोथींबीर वडी आवडीने सगळेजण खातात. भाजी,डाळीत सुद्धा सर्रासपणे कोथींबीर टाकली जाते. अशातच कोथींबीर आरोग्यासाठी देखील उत्तम असते. अशातच घरी बनवा कुरकुरीत कोथींबीर वडी. कोथंबीरीच्या वडीसाठी जाणून घ्या साहित्य आणि कृती…
साहित्य
- 1 जुडी हिरवीगार कोथिंबीर.
- अर्धा वाटी बेसन पीठ.
- थोडंसे तांदुळाचं पीठ.
- अर्धा चमचा तिखट.
- मीठ (चवीनुसार).
- थोडासा चिंचेचा कोळ.
- थोडासा गूळ.
- तेल.
- हळद.
कृती
- सर्वप्रथम कोथिंबीर धुवून कापडावर सुकत ठेवा.
- नंतर ती कोथींबीर बारीक चिरून घ्यावी.
- त्यात बेसन पीठ, तांदुळाचं पीठ, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ, गूळ, थोडं तेल गरम करून हळद हे सर्व घालून मिक्स करावं.
- नंतर त्यावर हळू हळू थोडं पाणी घालून सर्व घट्टसर मळून घ्यावं.
- आता या कोथींबीरीच्या पिठाचा गोळा करा.
- आता हा गोळा इडली पात्रात ठेवून वाफवून घ्यावा. (अंदाजे १५ मिनिटं) हे वाफवून घ्या.
- आता या उकडलेल्या पिठाचे सुरीने चकत्या करून घ्या.
- हे झाल्यावर कढईत तेल घालून या वड्या तळाव्यात.
- तसेच या वड्या छान खमंग लागतात. तुम्ही कशा सोबत सुद्धा या कोथींबीरीच्या वड्या खावू शकता.
हेही वाचा : Recipe : चमचमीत ढोबळी मिरचीचं रायतं
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -