उन्हाळ्याची सुरुवात झाली की आंबा आणि कैरी प्रेमींना अतिशय आनंद होतो. उन्हाळ्यात अंगाची कितीही लाही लाही होत असली तरीही उन्हाळयातच येणाऱ्या कैरीच्या आशेने सर्वजण दरवर्षी या सीझनची वाट आतुरतेने पाहत असतात.
कच्च्या कैऱ्या विकत आणून आपण त्यापासून अनेक साठवणीचे पदार्थ तयार करतो आणि वर्षभर या कच्च्या कैऱ्यांचा आस्वाद घेतो. कच्च्या कैरीचे लोणचे, पन्हं, असे अनेक पदार्थ बऱ्याच जणांच्या घरी बनवले जातात.
- Advertisement -
साहित्य :-
- मोहरी – १ टेबलस्पून
- जिरे – १ टेबलस्पून
- हिंग – १/२ टेबलस्पून
- लसूण पाकळ्या – ५ ते ६ (बारीक चिरलेला)
- कढीपत्ता – ७ ते ८ पान
- हळद – १ टेबलस्पून
- लाल तिखट मिरची पावडर – १ टेबलस्पून
- गुळ – २ टेबलस्पून (किसून बारीक केलेला)
- मीठ – १ टेबलस्पून
- तेल – २ ते ३ टेबलस्पून
- Advertisement -
कृती :-
- सर्वप्रथम कैरीचा देठ मोडून तिथून येणारा चीकधुवून घ्यावा. त्यानंतर कैऱ्या स्वच्छ पाण्यांत धुवून घ्याव्यात.
- आता या कैरीच्या मध्यम आकाराच्या फोडी करुन घ्याव्यात.
- आता एका कढईत थोडेसे तेल घेऊन त्यात फोडणीचे पदार्थ टाकावे. (कृतीमधले सर्व )
- आता गूळ संपूर्णपणे विरघळून होईपर्यंत हे मिश्रण चमच्याने ढवळत रहावे.
- सर्वात शेवटी या मिश्रणात कैरीच्या फोडी व मीठ घालावे. चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- आत गॅस बंद करून तयार झालेली फोडणीची कैरी एका बाऊलमध्ये काढून घ्यावी.
- फोडणीची कैरी थोडी थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यांत भरुन स्टोअर करुन ठेवावी.
हेही वाचा :