महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सांडगे हा पदार्थ बनवला जातो. काही ठिकाणी याला वडी म्हणतात तर काही ठिकाणी सांडगे म्हणतात. हे सांडगे वाळवून झाल्यानंतर त्या सांडग्याची भाजी किंवा आमटी करता येते.
- Advertisement -
सांडगे बनवण्यासाठी विविध डाळींचा वापर केला जातो. सांडग्यांची भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर छान लागते. चला तर मग या चमचमीत पारंपारिक पदार्थाची कृती पाहूयात.
साहित्य-
- पाव किलो मटकीची डाळ
- पाव कप चणा डाळ
- पाव कप मुग डाळ
- 7/8 लसूण पाकळ्या
- जिरं (दोन छोटे चमचे)
- मीठ (चवीनुसार)
- लाल तिखट (चवीनुसार)
- हळद
- हिंग
- Advertisement -
कृती-
- सर्वप्रथम, तिन्ही डाळी स्वच्छ धुवून घ्या.
- आता त्यात पाणी घालून रात्रभर डाळी भिजत ठेवा.
- डाळी भिजल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या.
- पुन्हा एकदा पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घ्या, यामुळे डाळीतील आंबूसपणा निघून जाईल.
- आता एका बाऊलमध्ये तिन्ही डाळी एकत्र मिक्स करा.
- त्यात ६ – ७ लसणाच्या पाकळ्या, व जिरं घाला. आता संपूर्ण साहित्य एकत्र मिक्स करा.
- मिक्सरच्या भांड्यात साहित्य घालून मिश्रणाची भरड तयार करा. डाळी जास्त बारीक करू नये.
- भरड तयार झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्या.
- त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, आणि हिंग घाला. आता हे संपूर्ण मिश्रण हाताने मिक्स करा.
- मिश्रण मिक्स झाल्यानंतर एक पाठ अथवा प्लास्टिक पेपर घ्या. त्याला तेलाने चांगले ग्रीस करून घ्या.
- आता त्यावर छोटे – छोटे सांडगे पाडून घ्या. व उन्हामध्ये हे सांडगे वाळवण्यासाठी ठेवा.
- निदान दोन दिवस तरी सांडगे उन्हामध्ये वाळवत ठेवा.
- सांडगे पूर्णपणे सुकल्यानंतर हवाबंद डब्यात सांडगे साठवून ठेवा.
हेही वाचा :
नवरात्रीत ट्राय करा उपवासाची लुसलुशीत इडली