Friday, May 17, 2024
घरमानिनीHealthकांदा भजी खाण्याचे अनेक फायदे; पण वेळ महत्त्वाची

कांदा भजी खाण्याचे अनेक फायदे; पण वेळ महत्त्वाची

Subscribe

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आवर्जून कांदा भजी खाल्ली जाते. कांदा भजीचे देशभरात लाखो चाहते आहेत. पण अनेकदा हेल्द एक्सपर्ट्स, कांदा भजी खाणं आरोग्यासाठी योग्य नसल्याचं म्हणतात. कारण यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते. पण खरं तर कांदा भजीमुळे जरी वजन वाढते, ही गोष्ट खरी असली तरीही जर योग्य वेळेत योग्य प्रमाणात कांदा भजी खाल्लास त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात.

कांदा भजी खाण्याची योग्य वेळ कोणती?

कांदा भजी तुम्ही दुपारच्या जेवणात खाऊ शकता. तसेच संध्याकाळी देखील भजीचे सेवन करु शकता. परंतु सकाळी नाश्त्यामध्ये आणि रात्रीच्या जेवणात कांदा भजी खाऊ नये. यामुळे तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. तसेच वजनही वाढू शकते.

- Advertisement -

कांदा भजी खाण्याचे फायदे

Crispy Onion Bhaji Recipe - Indian Kanda Bhaji - Cooking Frog

 

- Advertisement -

 

  • अनेकजण कच्चा कांदा खात नाहीत अशावेळी कांदा भजी खाल्ल्यास कांद्याचे पोषक तत्व शरीराला मिळतील.
  • कांदा भजीमध्ये बेसन, कांद्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. कांदा खाणं आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. यामुळे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात होणारी सर्दी, खोकल्याची समस्या दूर होते.
  • हिवाळ्यात कांदा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. कांद्यामध्ये कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. कांद्याचे सेवन केल्याने तुम्ही मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग आजारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकता.
  • भजीमध्ये वापरले जाणारे बेसन देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
  • भजी खाल्ल्याने हिवाळ्यातील थंडीपासून बचाव होते. बेसनाचे सेवन केल्याने शरीरात उर्जा निर्माण होते.

हेही वाचा :

कडूनिंबाच्या पानांमुळे 15-20 दिवसात होईल वजन कमी

- Advertisment -

Manini