घरमहाराष्ट्रJarange Vs Bhujbal : तुझं वय झालं आहे, गप्प बस नाही तर...

Jarange Vs Bhujbal : तुझं वय झालं आहे, गप्प बस नाही तर टपकन…; जरांगेंकडून पुन्हा एकेरी उल्लेख

Subscribe

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा लढा देत आहेत. त्यांचा हा लढा अद्यापही सुरू असला तरी 26 जानेवारीला त्यांच्या या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा मसुदा मनोज जरांगे यांना दिल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे. मात्र याला मंत्री अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यासह ओबीसींकडून विरोध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नका, त्यांना वेगळं आरक्षण द्या अशी मागणी छगन भुजबळ हे आधीपासूनच करताना दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर एकेरी शब्दांत टीका केली आहे. (Jarange Vs Bhujbal You are of age dont shut up or you will go down the drain Again single mention of Chhagan Bhujbal by Manoj Jarange Patil)

हेही वाचा – Supriya Sule : केंद्र सरकारने राज्य सरकार बरखास्त करावं, सुप्रिया सुळे यांची मागणी

- Advertisement -

छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तू ओबीसींचं वाटोळं केलं आहे. पण आम्ही ओबीसींचं वाटोळं होऊ देणार नाही. तू गप्प बस नाहीतर टपकन वर जाशील. मी तुला सांगतो, तू आमच्या नादी लागू नकोस. गोरगरीब ओबीसींचं वाटोळं करू नकोस. मराठे ओबीसी आरक्षणात गेले आहेत. आता हेच ओबीसी बांधव त्याला (छगन भुजबळ) म्हणत आहेत की, तू काय कामाचा आहेस? तुला बाहेर निघायची वेळ आली आहे. आम्ही सगळे मिळून तुला बाहेर फेकतो, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा – Supriya Sule : केंद्र सरकारने राज्य सरकार बरखास्त करावं, सुप्रिया सुळे यांची मागणी

- Advertisement -

तुला मी काही सोडत नाही

छगन भुजबळ यांच्या वयावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गप्प राहा, येडपट माणूस आहे. हे कसं ओबीसींच्या हाताला लागलं. ओबीसींचं वाटोळं करतो आहे. मला म्हणतो उपोषण करू नको, मग तू नको करू आंदोलन, गप्प पड एका जागी. तू माझ्या नादी लागू नको, तुझे वय झाले आहे. तुझ्या वयानुसार आम्ही तुझा आदर करू. तू गप्प बसला तर आम्ही तुझा शंभर टक्के आदर करू. पण जर गप्प बसला नाही तर तुला मी काही सोडत नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -