Friday, April 26, 2024
घरमानिनीआपल्या पालकांचा खर्चाचा बोजा नवऱ्यावर टाकने किती योग्य...

आपल्या पालकांचा खर्चाचा बोजा नवऱ्यावर टाकने किती योग्य…

Subscribe

लग्न करणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील फार महत्वाचा निर्णय असतो. म्हणूनच लग्नापूर्वी मुलीच्या आणि मुलाच्या परिवारातील मंडळी एकत्रित बसून काही गोष्टींवर चर्चा करतात. जर दोघांपैकी एका घराची परिस्थिती ही समोरच्या व्यक्तींऐवढी उत्तम नसेल तर त्या गोष्टी आधीच क्लिअर केलेल्या बऱ्या. जेणेकरु पुढे जाऊन त्यामुळे नव्या जोडप्यांमध्ये वाद व्हायला नको.

जर मुलाने आधीच मुलीला त्याच्या घरातील परिस्थितीबद्दल स्पष्ट केले असेल तर तिने सुद्धा त्या मुलाशी लग्न करायचे की नाही हे ठरवले पाहिजे. लग्न झाल्यानंतर त्या मुलाला त्याच्या परिवारावरुन कोसणे फार चुकीचे आहे. त्याचसोबत आता लग्न होऊन सासरी आलेल्या मुलीने येथील परिस्थिती कशी सुधारेल हे सुद्धा पहावे. याचा अर्थ नाही की, वेळोवेळी तिने आपल्या नवऱ्याची अथवा त्याच्या परिवाराची तुलना तिच्या परिवाराशी केली पाहिजे.

- Advertisement -

दोन्ही घरांना तिने एकत्रित बांधून ठेवले पाहिजे. या व्यतिरिक्त जर महिलेला आधीच नवऱ्याच्या घरच्या स्थिती बद्दल सांगितले असेल तरीही मुद्दाम त्याच्यावर आपल्या पालकांचा सुद्धा बोजा टाकू नये. कारण नवऱ्याला आधीच त्याच्या घराची स्थिती कशी सुधारेल याचे टेंन्शन असतेच. पण तुम्ही तसे केले नाही तर तो तणावाखाली जाऊ शकतो. यामुळे तुमच्या नात्यात वाद ही होऊ शकतात.

आपला नवरा आपल्या पालकांच्या खर्चाचा बोजा उचलत नाही याचा अर्थ असा होत नाही की, तो तुमच्यावर प्रेम करत नाही किंवा तुमच्या इच्छा पु्र्ण करत नाही. तो त्याच्या परीने त्याला जसे जमेल त्या पद्धतीने तुमच्यासह परिवाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. अगदीच बायको या गोष्टीवरुन हट्टाला पेटली असेल तर काही गोष्टींबद्दल बायकोच्या पालकांशी थेट बोलले पाहिजे. त्यांना समजावून सांगा तुमची सध्याची कशा प्रकारे दोन परिवारामध्ये घुसमट होत आहे.

- Advertisement -

प्रत्येक नात्यात पर्सनल स्पेस देण्याची फार आवश्यकता असते. कारण प्रत्येकासाठी दोन परिवारांचे महत्व फार वेगवेगळे असू शकते. दोन घरांना जोडण्यासाठी तुम्ही जितका प्रयत्न करता तेवढाच प्रयत्न तो सुद्धा त्याच्या क्षमतेने करण्याचा प्रयत्न करेल. तसेच बायकोने सुद्धा आपल्या नवऱ्याला समजून घ्यावे. जेणेकरुन तुमचे नाते टिकेलच आणि दोन्ही परिवारांमध्ये समतोल साधता येईल.


हेही वाचा- नवरा पसंत नाही तरी नाते टिकवायचेय, ‘या’ टीप्स येतील कामी

- Advertisment -

Manini