Saturday, April 27, 2024
घरमानिनीRelationshipRelationship Tips : नवंकोरं रिलेशनशिप असे जपा

Relationship Tips : नवंकोरं रिलेशनशिप असे जपा

Subscribe

आजकाल रिलेशनशिपमध्ये असणे अगदी सामान्य झाले आहे. नाते जुने असो वा नवं नाते टिकण्यासाठी आणि मजबूत होण्यासाठी दोघांनीही काही गोष्टी करणे अत्यंत महत्वाचे असते. तुमचं जर नातं नवंकोरं असेल तर तुम्ही अधिकच लक्ष देण्याची गरज असते. नाहीतर नातं फुलण्याआधीच तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला रिलेशनशिप एक्सपर्टने सांगितलेल्या काही टिप्स सांगत आहोत, जे तुमचं नवंकोरं नातं जपण्यासाठी तुम्हाला मदत करतील.

भूतकाळात भूतकाळातच ठेवा – कोणत्याही नात्यात भूतकाळ हा भूतकाळातच ठेवावा. रिलेशनशिप एक्सपर्टच्या मते, एखाद्या नवीन व्यक्तीला डेट करताना अनेकजण एक चूक करतात ती म्हणजे पार्टनरचा भूतकाळ पुन्हा पुन्हा नात्यात आणणे. असे केल्याने तुमच्या नात्यावर त्याचा परिणाम होतो. काहीजण पहिल्या पार्टची तुलना नवीन पार्टनर सोबत करतात असे करणे नात्यात कटुता आणण्याचे काम करू शकते. त्यामुळे ओव्हरशेरिंग टाळायला हवे आणि आपले संपूर्ण लक्ष डेटिंग करत असलेल्या व्यक्तीवर आणि त्याला जाणून घेण्यावर केंद्रित करायला हवे.

- Advertisement -

तुलना करू नये – आपल्या नात्याची किंवा पार्टनरची तुलना नात्यात कधीही करू नये. असे केल्याने नात्यावर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमचं नातं जर नवंकोरं असेल तर नात्यात चुकूनही तुलना करू नये. तुलना केल्याने पार्टनरच्या मनात तुमच्याबद्दल निगेटिव्ह विचार येऊ लागतात तो तुमच्यापासून दूर जाऊ शकतो. अशाने तुमचे नातं खुलण्याआधीच ते कोमेजून जाईल.

कृती करा – नाते जुने असो वा नवंकोरं नात्यात शब्दांपेक्षा कृतीला अधिक महत्व आहे. नव्या नात्यात पार्टनरच्या अधिक अपेक्षा असतात. तुम्ही जर नात्यात केवळ शब्दाच्या आणाभाका करत असाल तर याचा नात्यावर परिणाम होऊ शकतो. तुम्ही जर नात्यात पार्टनरला विविध प्रॉमिसेस केले असतील तर ते केवळ शब्दांपुरते मर्यादित ठेऊ नका, कृती करा. जे प्रॉमिसेस केले असतील ते पूर्ण करण्याचा प्रयन्त करा.

- Advertisement -

ऐकण्याची सवय लावा – ऐकणे हे एक कौशल्य आणि संवादाचे साधन आहे जे बहुतेक लोक करत नाही. पार्टनर जर बोलणारा असेल तर नात्यात त्याचे ऐकण्याची तयारी ठेवा. अशाने तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी परफेक्ट आणि बेस्ट पार्टनर ठरता. जेव्हा तुम्ही पार्टनरचे म्हणणे कुतुहुलाने ऐकता तेव्हा ते त्याच्यासाठी स्वर्गाहून सुंदर असते.

वेळ द्या – नवंकोरं नात्यात एकमेकांसाठी वेळ दिल्याने एकमेकांबद्दल जाणून घेण्यास मदत होते. कोणत्याही नव्या नात्यात एकमेकांना वेळ वेळ देणे अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. नात्यात एकमेकांना वेळ दिल्याने एकमेकांबद्दल आपुलकी, प्रेम यासारख्या भावना द्विगुणित होतात.

 

 

 


हेही वाचा : नातेसंबंधात कटुता येण्याची कारणे आणि निराकरण

 

- Advertisment -

Manini