Saturday, May 11, 2024
घरमानिनीHealthMonsoon: पावसाळयात 5 वर्षांपर्यंतच्या मुलांचा असा ठेवा डाएट

Monsoon: पावसाळयात 5 वर्षांपर्यंतच्या मुलांचा असा ठेवा डाएट

Subscribe

पावसाळा फार आनंददायी वाटत असला तरीही आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्वाचे असते. खासकरुन लहान मुलांची. त्यामुळे लहान मुलांना पावसाळ्यात नक्की कोणते पदार्थ खायला द्यावेत हे पालकांना कळले पाहिजे. तळलेले पदार्थ, पाकिट बंद पदार्थांऐवजी त्यांना तुम्ही सलाद, पोषक तत्त्वयुक्त पदार्थ खायला देऊ शकता. यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही मजबूत राहिल आणि ते आजारांपासून ही दूर राहतील. तर पाहूयात पावसाळ्यात 5 वर्षांपर्यंतच्या मुलांना कसा असला पाहिजे डाएट. (Monsoon diet plan for children)

diet plan for children (photo credits-google)
diet plan for children (photo credits-google)

पावसाळ्यात मुलांना हे पदार्थ द्या खायला
-मान्सूनमध्ये मुलांना चेरी, लिची, जांभळ, पिस्ता अशा गोष्टी खाण्यास द्या. यामध्ये भरपूर प्रमाणात अँन्टीऑक्सिडेंट आणि पोषक तत्त्व असतात. त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
-मुलांच्या पदार्थांत लसूण, काळी मिरी आणि वेलचीचा सुद्धा समावेश करा. यामुळे त्यांची पचनक्रिया सुधारेल.
-मुलांना दररोज हेल्दी स्नॅक अक्रोड, खजूर अशा गोष्टी खायला द्या.
-अंडी, सोयाबिन, डाळी असे पोषक पदार्थ खाण्यास द्या.

- Advertisement -

पावसाळ्यात मुलांना ‘या’ गोष्टींपासून ठेवा दूर
-तळलेले पदार्थ, तिखट पदार्थ आणि स्ट्रिट फूड पासून दूर ठेवा
-आधीपासून कापून ठेवलेले फळं किंवा सलाद देऊ नका. मान्सूनमध्ये मुलांना नेहमीच फ्रेश फळं कापून द्या.
-पावसाळ्यात मुलांना मासे-मांस देऊ नका.

- Advertisment -

Manini