घरठाणेठाण्यात पावसाचा रात्रीचा खेळ; मध्यरात्री तीन तासांत 57.11 मिमी बरसला

ठाण्यात पावसाचा रात्रीचा खेळ; मध्यरात्री तीन तासांत 57.11 मिमी बरसला

Subscribe

ठाणे : ठाणे (Thane) शहरात पावसाचा (Rain) चक्क रात्रीचा खेळ चालला आहे. मागील चोवीस तासांत 85.49 मिमी पावसाची नोंद झाली असून मध्यरात्री अवघ्या तीन तासांत 57.11 मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. अशाप्रकारे रात्री पाऊस झोडपत असताना सोमवारी सकाळपासून पावसाचे बरसणे सुरूच होते. याचदरम्यान शहरात 9 ठिकाणी झाडे कोसळली असून 7 ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. या घटनांमुळे 5 वाहनांचे नुकसान झाले आहे. कळवा येथील महापालिकेच्या रुग्णालयात सिलिंग पडले असून मुंब्र्यात विहीर आणि त्याच्या आजूबाजूचा भाग खचल्याने त्यामध्ये दुचाकी पडली आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. (Rainy night game in Thane 57.11 mm rained in three hours during midnight)

यावर्षी उशिरा सुरू झालेल्या पावसाने पाहीजे तसा बरसलेला नाही, मात्र गेल्या 48 तासांत 144.39 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यातच रविवारी सकाळी साडेआठ ते सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 85.49 मिमी पाऊस बरसला आहे. यामध्ये मध्यरात्री अडीच ते साडेतीन या एका तासांत 38.87 मिमी पाऊस झाला आहे, तर अडीच ते साडेचार या तीन तासांत 57.11 मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. सोमवारी सकाळीही पावसाची रिमझिम सुरू असून अधूनमधून पावसाची मोठी सर येऊन जात असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Rain : मुंबई, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पाऊस

आपत्ती व्यवस्थापन कक्षात एकूण 39 तक्रारींची नोंद

एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापन कक्षात एकूण 39 तक्रारींची नोंद झालेली आहे. त्यामध्ये 90 ठिकाणी झाडे पडली असून 7 ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून वाहनांवर किंवा घरावर तसेच संरक्षण भिंतीवर पडल्या आहेत. यामध्ये 4 चारचाकी, तर एक दुचाकी अशा 5 वाहनांचे नुकसान झाले आहे. एका ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय सहा ठिकाणी झाडांची स्थिती धोकादायक असून एका ठिकाणी कंपाऊंड भिंत पडली आहे. तसेच 12 अन्य घटनांचाही या तक्रारींमध्ये समावेश आहे.

- Advertisement -

खचलेल्या विहिरीत दुचाकी पडली
मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळील जीवन बाग या ठिकाणी असलेली विहीर आणि तिच्या आजूबाजूचा परिसर खचल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून खचलेल्या विहिरीत दुचाकी पडली आहे.

हेही वाचा – Instagramचा नाद, रिल्स फॉलो केल्यामुळे तरुणाला लाखोंचा गंडा; पूजा भोईरकडून पुन्हा फसवणूक

पालिकेच्या रुग्णालयामधील पीओपी सिलिंग पडले
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील हृदयरोग विभागाच्या समोरील चालण्याच्या जागेमधील पीओपी (प्लास्टर) सिलिंग पडल्याची घटना रविवारी (25 जून) रात्री सव्वा अकरा ते साडेअकराच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही, तसेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर सुमारे 100 मीटर लांब असलेल्या पीओपी सिलिंग पैकी 20 मीटर पीओपी सिलिंग पडले असून उर्वरित सिलिंग धोकादायक झाल्याने ती ठाणे महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून काढण्यात आलेली आहे.

संरक्षण भिंत चाळीवर पडली
वर्तक नगर, लक्ष्मी-चिराग नगर या ठिकाणी आय थिंक लोढा (i THINK LODHA)ची अंदाजे 35 फुट लांब व अंदाजे 8 फूट उंच संरक्षण भिंत तसेच त्या भिंती लगत असलेल्या खंडू मुठे चाळीतील गणेश बेंडकुळे यांच्या घराची भिंतही पडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास समोर आली, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकापट्टी बांधण्यात आली आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -