Sunday, May 5, 2024
घरमानिनीFashionMonsoon Fashion Tips: मॉन्सूनमध्ये वापरू नयेत 'या' फॅब्रिकचे कपडे

Monsoon Fashion Tips: मॉन्सूनमध्ये वापरू नयेत ‘या’ फॅब्रिकचे कपडे

Subscribe

पावसाळ्याच्या दिवसात हवामानात अधिक ओलरसपणा निर्माण होतो. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्यासह कपड्यांबद्दल ही काळजी घ्यावी. यावेळी जर तुम्ही योग्य फॅब्रिकचे कपडे घातले नाही तर तुम्ही खुप अनकंम्फर्टेबल राहता. अशातच पावसाळ्यात कपडे निवडताना नक्की कोणती काळजी घ्यावी हेच पाहूयात. (Monsoon Fashion Tips)

-हैवी डेनिम

- Advertisement -


प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये डेनिमचे कलेक्शन असतेच. परंतु पावसाळ्यात डेनिमचे कपडे घालणे टाळावेत. यामुळे तुम्ही अनकंम्फर्टेबलच नव्हे तर खुप गरम होत असल्याचे तुम्हाला जाणवेल. डेनिमचे कपडे पावसात भिजल्यानंतर ते लवकर सुकत नाहीत. त्यामुळे फंगल इंन्फेक्शन होऊ शकते.

-सिल्क

- Advertisement -


सिल्कचे कापड हे डेलिकेट असते. मात्र पावसाळ्यात सिल्कचे कपडे घालण्यापासून दूर रहा. सिल्कच्या कपड्यात ओलावा शोषून घेतला जातो. त्यामुळेच पावसाळ्यात सिल्क फॅब्रिकचे कपडे घालू नयेत.

-सॅटिन


सॅटिनचे कपडे अत्यंत सुंदर दिसात. मात्र ते सॉफ्ट आणि चकचकीत असतात. हे कापड सिल्क आणि सिंथेटिक फायबर पासून तयार केलेले असते. यामुळेच ते पावसाळ्यात घालू नयेत.

-वेलवेट


वेलवेटचे कापड दिसायला फार सुंदर दिसते. या फॅब्रिक पासून तयार करण्यात आलेले आउटफिट घातल्यानंतर ही आपण सुंदर दिसतो. पण पावसाळ्यात वेलवेटचे कापड घालणे टाळू नका. यामुळे घाम येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.


हेही वाचा- जुन्या कॉटनच्या कपड्यांचा असा करा उपयोग

- Advertisment -

Manini