Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthMonsoon: स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी 'या' गोष्टी तुमच्याकडे असायलाच पाहिजेत

Monsoon: स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी तुमच्याकडे असायलाच पाहिजेत

Subscribe

पावसाळा सुरू झाला आहे. वरुण राज्याच्या आगमाने वातावरण हे प्रफुल्लित झाले आहेत. परंतु, पावसाळ्यात तुम्हाला अनेक समस्याचा सामना करावा लागतो. खासकरून ट्रॅवलिंग करताना जास्त समस्या येतात आणि पावसाळ्यात हलगर्जी पणा करून चालणार नाही. तुम्हाला वाटत असे की, पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि त्या कोणत्या गोष्टीकडे तुम्ही जास्त लक्ष दिले पाहिजे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हवामानची माहिती घेणे

पावसाळ्यात प्रवास करण्यापूर्वी हवामानाची माहिती करून घ्या. यासाठी तुम्ही ऑनलाइन देखील चेक करू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत, त्या ठिकाणचे हवामान कसे आहे? याबद्दल तुम्ही ऑनलाईन माहिती घेऊ शकता. यासाठी तुम्ही ऑनलाईन हवामान रिपोर्ट पाहू शकता. यानुसार, तुम्ही प्रवास करावा.

- Advertisement -

एमरजेंसी किट ठेवा

पावसाळ्यात तुमच्या बॅगेत एमरजेंसी किट ठेवा. या किटमध्ये कपड्यांची जोडी, पट्टी, क्रीम आणि काही आवश्यक औषधे ठेवा. या पिशवीत छत्री ठेवायला विसरू नका. पावसाळ्यात छत्रीचा सर्वाधिक उपयोग होतो.

योग्य फुटविअर घाला

पावसाळ्यात सर्वत्र पाणीच पाणी असते. अशा वेळी घसरण्याची शक्यता जास्त असते. यामुळे तुम्ही पाण्यात घसरु नये म्हणून तुम्ही फुटविअरकडे खास लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही नॉन स्लिपरी फुटविअर खरेदी करा.

- Advertisement -

ड्राइविंगपासून वाचा

जर तुम्ही गाडीने प्रवास करत असाल तर स्पीडकडे लक्ष ठेवा. घरातून निघण्यापूर्वी तुम्ही एकदा कार चेक करा. जेणे करून तुम्हाला अंदाज येईल की, गाडीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या नाही. कारची हेडलाईट आणि विंड स्क्रीन वायपर कसे आहे, ते योग्य काम करते का जर ते काम करत नसेल, तर तुम्हाला प्रवासादरम्यान त्रास होऊ शकतो.

इलेक्ट्रॉनिक वस्तूना हात लावू नका

पावसाळ्यात चुकून ही इलेक्ट्रॉनिक वस्तूना हाल लावू नका. यामुळे करंट लागू शकतो. एवढेच नाही, तर तुम्हाला हॅवी इलेक्ट्रॉनिक आयट्मस देखील अनप्लग केले पाहिजे. पावसाळ्यात लाइट जात येत असते. यामुळे वॉल्टेजमध्ये चढ-उतारचा सामना करावा लागू शकतो. जर वाअर ओली असेल तर कोणत्याही व्यक्तीने त्याला हात लावू नये. यावेळी करंट लागण्याची भीती असते.

अनहेल्दी फूड्सपासून लांब राहा

पावसाळ्यात खाने-पिण्याकडे जास्त लक्ष द्यावे. पावसाळ्यात सर्दी,खोकला आणि ताप यासारखे आजार होतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या इम्युनिटी स्ट्रॉन्ग करणे गरजेचे आहे. यासाठी फूड्स खा, यामुळे तुम्हाला पोषक तत्व मिळतील.

 

 

- Advertisment -

Manini