घरमहाराष्ट्रनाशिकविठ्ठल नामाची शाळा भरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

Subscribe

बॉईज टाउन शाळेत रंगला नयनरम्य रिंगण सोहळा

नाशिक : वारकर्‍यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर, अशा विठ्ठलमय वातावरणात नाशिक शहरातील बॉइज टाऊन शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळयात आकर्षण ठरले.

दरवर्षी प्रमाणे यंदाही नाशिकच्या बॉईज टाऊन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकर्‍यांचे पोशाख परिधान केले होते. एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुले मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली, केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी बॉईज टाऊन मध्ये अवतरले.

- Advertisement -

यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला. अन अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. दोन वर्षे करोनामुळे खंड पडलेल्या दिंडीला या वर्षी पुन्हा सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी शाळा परिसरात एकच आनंद उत्सव साजरा केला. यावेळी जवळजवळ ४००विद्यार्थी यांनी वारकर्‍यांची वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभागी झाले होते. शाळा परिसरात पंढरपूर भेटीच स्वरूप प्राप्त झाले होते. त्याचबरोबर वारीच मुख्य आकर्षण असलेले गोल रिंगण देखील यावेळी करण्यात आले होते. तर वरूण राजाने देखील यावेळी आपली कृपा बरसवत हा आनंद द्विगुणित केला.

बॉईज टाउनची 1४ वर्षाची परंपरा

गेल्या चौदा वर्षांपासून बॉईज टाऊनच्या माध्यमातून रिंगण सोहळा आयोजित केला जातो. दरवर्षी दिंडीचे आयोजन केले जाते, त्या त्या वेळी पाऊसाने आम्हाला साथ दिली आहे. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना संस्कृती, परंपरांचे दर्शन या सोहळयातून घडते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -