Independence Day 2022: Recipe काही मिनिटांत तयार होणारा स्पेशल ‘तिरंगा केक’; जाणून घ्या संपूर्ण कृती

Independence Day 2022: Recipe काही मिनिटांत तयार होणारा स्पेशल ‘तिरंगा केक’; जाणून घ्या संपूर्ण कृती

15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरातच साजरा केला जात आहे. केंद्र सरकार कडूनही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. प्रत्येक जण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कलात्मक पद्धतीने साजरा करत आहे.

तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबासह स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही स्पेशल रेसिपी बनवून साजरा करा. स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात तुम्ही तिरंगा केकच्या(tiranga cake) पाककृती बनवून तुमच्या कुटुंबासोबत स्वातंत्र्य दिन साजरा करू शकता. जर तुम्हाला स्वातंत्र्यदिनी मित्र आणि कुटूंबासोबत काही खास क्षण घालवायचे असतील तर ही तिरंगा केक रेसिपी बनवा आणि या दिवशी सर्वांना सर्व्ह करा. हा केक स्वातंत्र्यदिनी बनवण्याची अतिशय सोपी रेसिपी आहे जी काही मिनिटांत तयार केली जाऊ शकते. ते बनवण्यासाठी खुप मेहनत किंवा जास्त साहित्य लागत नाही. चला जाणून घेऊया या सोप्या रेसिपीबद्दल.

हे ही वाचा – पावसाळ्यात नेहमीचीच भजी खाऊन कंटाळा आलाय मग नक्की ट्राय करा या हटके रेसिपी

तिरंगा केक बनविण्यासाठी लागणारे साहित्य –

– एक मोठे ब्रेडचे पॅकेट

– आंबा

– एका वाटी मलई

– पिठी साखर

– पेरूचा जॅम

– गुलाब पाणी

– सुका मेवा ( काजू, बदाम, पिस्ता)

हे ही वाचा – Receipe : उपवासातील थकवा दूर करण्यासाठी पौष्टिक ‘मखाना खीर’ नक्की ट्राय करा

तिरंगा केक बनविण्याची कृती – 

स्वातंत्र्य दिनादिवशी तिरंगा केक बनवण्यासाठी सर्वात आधी मलई साखर आणि गुलाबपाणी घालून ते मिश्रण चांगले फेटून घ्या. उरलेल्या साखरेत आंबा मिक्स करून चांगले फेटून घ्या. आता एका प्लेटमध्ये ब्रेड ठेवा आणि त्यावर आंब्याचे मिश्रण व्यवस्थित पसरवा. त्यानंतर त्यावर दुसरा ब्रेड ठेवून क्रीमचे मिश्रण पसरवा. आता त्यावर ब्रेडचा तिसरा स्लाइस ठेवा. त्यावर जाम लावून घ्या. अशाच प्रकारे चौथ्या ब्रेड स्लाइसला लावा आणि क्रीमचे मिश्रण लावा. आता सजावटीसाठी त्यावर काजू, बदाम आणि पिस्ता यांचे काप लावा. हा केक सुंदर बनवण्यासाठी त्याचे मधून दोन भाग करा. तुमचा हा केक तीन रंगात दिसेल. तुमची केक रेसिपी तयार होईल मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत सर्व्ह करा. आणि या तिरंगा केकचा आनंद घ्या.

हे ही वाचा –  Receipe : साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळ आलाय? मग या वेळी ‘उपवासाचा ढोकळा’ नक्की ट्राय करा

First Published on: August 13, 2022 10:27 AM
Exit mobile version