पावसाळ्यात नेहमीचीच भजी खाऊन कंटाळा आलाय मग नक्की ट्राय करा या हटके रेसिपी

बाहेरचे पदार्थ न खाता जर का असे चटपटीत पदार्थ घारीचा बनवता आले तर... अशाच काही चटपटीत रेसिपी आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. नेहमीचीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या वेगळ्या रेसिपीज नक्की ट्राय करा आणि ते ही कृतीसह.

पावसाळ्यात वेगवेगळ्या रानभाज्या बाजारात येतात त्या सगळ्याच भाज्या आरोग्यासाठी उत्तम असतात. पावसाळा म्हटलं की माणसं त्यांच्या आरोग्याकडे आणि आहाराकडे विशेष लक्ष देतात. पण पावसाळा म्हटलं की प्रत्येकालाच काही न काही चटपटीत खावंसं वाटतं. पण बाहेरचे पदार्थ न खाता जर का असे चटपटीत पदार्थ घारीचा बनवता आले तर… अशाच काही चटपटीत रेसिपी आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. नेहमीचीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या वेगळ्या रेसिपीज नक्की ट्राय करा आणि ते ही कृतीसह.

हे ही वाचा – ऐकावं ते नवलच! ‘हेलिकॉप्टर भेळ’ तुम्हीसुद्धा खाल्लीय का?

चटपटीत पालक पुरी –

पालक स्वच्छ धुवून त्याची पाने वेगळी करा. आता त्यांना एक कप पाण्यात उकळवा आणि थंड झाल्यावर बारीक चिरून घ्या. एका भांड्यात गव्हाचं पिठ घेऊन पालक प्युरी, मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि जिरेपूड एकत्र करून पीठ व्यवस्थित मळून घ्या. पिठाच्या पारित मॅश पनीर भरा. त्यात धणे, लाल मिरची आणि गरम मसाला आणि चिरलेली कोथिंबीर घाला. पिठाचे छोटे गोळे करून त्यात हे पनीरचे मिश्रण भरून हाताने सपाट करा किंवा शॉर्टब्रेडच्या आकारात लाटून घ्या. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि ते सोनेरी होईपर्यंत तळा.

 

थंडगार पेरूचं सरबत –

एका पॅनमध्ये बदाम, काजू आणि पिस्ता एक मिनिट भाजून घ्या आणि त्याची पूड करा. त्याच कढईत बडीशेप तळून घ्या आणि बाजूला ठेवा. भाजलेले हे पदार्थ गार झाल्यावर त्यात गुलाबाच्या पाकळ्या घालून ते मिक्सरमधून बारीक करून घ्या. आता दुधात दोन चमचे थंडाई पावडर, काळी मिरी पावडर, वेलची पावडर आणि पेरूचा रस घाला. 3-4 तास फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर सर्व्ह करा.

हे ही वाचा – चविष्ट आणि पौष्टिक नाश्त्यासाठी मूग-पनीर चीला नक्की ट्राय करा

कॉर्न कबाब –

corn kababबटाटे उकडून ते काहीसे थंड झाल्यावर मॅश करून घ्या. त्यानंतर पाणी उकळून त्यात कॉर्न घालून ते उकडून घ्या आणि मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करा. यानंतर त्यात मीठ, काळी मिरी, लाल तिखट आणि कसुरी मेथी मिक्स करून छोट्या टिक्की तयार करा. कढईत तूप किंवा तेल गरम करून या टिक्की सोनेरी होईपर्यंत तळा. हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

मूग डाळ हलवा –

मूग डाळ प्रेशर कुकरमध्ये सुवासिक खरपूस तळून घ्या. पाणी घालून तीन शिट्ट्या कुकरमध्ये उकडून घ्या. एका पातेल्यात गूळ आणि पाणी वितळवून घ्या. थंड झाल्यावर गाळून घ्या. गुळाच्या पाकात शिजलेली डाळ नीट मिक्स करून घ्या आणि मंद आचेवर उकडून घ्या. नंतर त्यात नारळाचे दूध घालून उकळावे. मिश्रण सतत ढवळत राहा नाहीतर ते जळू शकते. वेलची पूड आणि तळलेले काजू-बेदाणे घालून चांगले मिसळा आणि सर्व्ह करा.

घरच्या घरी अश्या मस्त रेसिपीज नक्की ट्राय करा. चवीला पण उत्तम आणि प्रकृतीसाठीही.

हे ही वाचा – एकदम सोप्पी रेसिपी! क्रंची, स्पायसी आणि चिझी फ्रेंच फ्राईज घरच्या घरी कसे बनवाल?