Tuesday, May 14, 2024
घरमानिनीHealth'हे' शिळे पदार्थ चुकूनही खावू नका, होतील दुष्परिणाम

‘हे’ शिळे पदार्थ चुकूनही खावू नका, होतील दुष्परिणाम

Subscribe

लहानपणापासून आपण ऐकतो की, ताजं जेवण हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र शिळे पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला नुकसान पोहचते. वेळेअभावी आपण एकाच वेळी खुप जेवण आधीच बनवून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून खातो. मात्र असे वारंवार करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. असे कोणते पदार्थ आहेत जे शिळे झाल्यानंतर अजिबात खाऊ नयेत.

-भात

- Advertisement -


शिजवलेला भात हा सुद्धा शिळा होतो. यामध्ये बॅसिलस सेरेअस नावाचे बॅक्टेरिया तयार होतात. जे भात एका मर्यादित काळानंतर खराब करू शकतात. अशातच जेव्हा तुम्ही पुन्हा तो गरम करता आणि खाता तेव्हा भात हा टॉक्सिक होतो. फूस स्टँडर्ड्स एजेंसीच्या कारणास्तव, जर पुन्हा गरम करून खाल्ल्यानंतर कधीकधी फूड पॉइजनिंगची समस्या उद्भवू शकते.

-बटाटा

- Advertisement -


शिल्लक राहिलेली बटाट्याची भाजी सुद्धा आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. एका रिपोर्टनुसार, शिजवलेल्या बटाट्यात असा एक बॅक्टेरिया असतो जो बॉटुलिज्मचे कारण ठरू शकते. यामुळे थकवा जाणवणे, अस्पष्ट दिसणे आमि बोलण्यास समस्या उद्भवू शकतात.

-अंडी


अंड किंवा अंड्याने तयार करण्यात आलेली डिश पुन्हा गरम करू नये. असे केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. खरंतर शिळ्या अंड्यात सेल्मोनेला नावाचे बॅक्टेरिया तयार होतात. यामुळे फूड पॉइजनिंगची समस्या होऊ शकते.

-चिकन आणि सीफूड


अंड्या प्रकारे चिकन आणि सीफूड सुद्धा शिळे होतात. पुन्हा गरम केल्यानंतर किंवा शिळं खाल्ल्याने फूड पॉइजनिंगची समस्या होऊ शकते.


हेही वाचा- पोटाची चरबी कमी करतील ‘हे’ फूड कॉम्बिनेशन

 

- Advertisment -

Manini