घरमुंबईहुकूमशाहीचं सरकार आम्हाला पळवून लावायचंय; आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर साधला निशाणा

हुकूमशाहीचं सरकार आम्हाला पळवून लावायचंय; आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर साधला निशाणा

Subscribe

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी आज (14 ऑगस्ट) मुंबईत बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी चांगलं काम केल्यानं काहींना पोटदुखी होते, असा टोला राज्यसरकारला लगावला. तसेच हुकूमशाहीचं सरकार आम्हाला पळवून लावायचं आहे. असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला. (We want to run away from the dictatorial government Aditya Thackeray targeted the Modi government)

हेही वाचा – अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू; कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

- Advertisement -

मी कधीही ऑफरच्या राजकारणाला महत्त्व देत नाही

आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्हालाही भाजपाची ऑफर आहे, मात्र अजितदादा आणि एकनाथ शिंदेंमुळे तुम्ही जात नाहीत. या प्रश्ना उत्तर देताना ते म्हणाले की, मी कधीही ऑफरच्या राजकारणाला महत्त्व देत नाही. येत्या काळात ‘इंडिया’ची बैठक मुंबईमध्ये होणार आहे. सगळेच पक्ष देशासाठी, सत्यासाठी लढत आहेत. ते एकत्र आले आहेत. देशभरातून एकच आवाज आहे बदल घडवणारच. कारण हुकूमशाहीचं सरकार आम्हाला पळवून लावायचं आहे. उद्या आपण 15 ऑगस्ट साजरं करणार आहोत. पण ज्या आझादीसाठी आपण लढलो, ती आझादी आज आपल्या देशात राहणार की नाही राहणार? जे लोकतंत्र आपल्याला पाहिजे ते राहणार की नाही राहणार? असा प्रश्न आदित्य ठाकरेंकडून यावेळी उपस्थित करण्यात आला.

हेही वाचा – मनसेची पुढची तयारी लोकसभा निवडणुकीसाठी असेल – राज ठाकरे

- Advertisement -

लोकांनाच ठरवायचं आहे ते कोणाच्या बाजूने

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘सामना’मध्ये पक्षाची भूमिका मांडलेली आहे. सध्याचं राजकारणात प्रामाणिक, एकनिष्ठ आणि दुसऱ्या बाजुला भ्रष्टाचारी लोक तसेच स्वार्थी लोक आहेत. त्यामुळे लोकांनाच ठरवायचं आहे, ते कोणाच्या बाजूने आहेत.

बीडीडी प्रकल्पाचा विकास चालू

दरम्यान, बीडीडी प्रकल्पावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘अपेक्षित होता त्याप्रमाणे या प्रकल्पाचा विकास चालू आहे. आपल्या सरकारच्या काळात बीडीडी प्रकल्प सुरू झाला. त्यामुळे माझी सवय आहे की, जे काम आमच्या सरकारच्या काळात सुरू झाले आहे, त्यावर मी लक्ष ठेवून असतो. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत येथील लोकांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवण्यात आले आहे, पण तेथे पाण्याचा प्रश्न आहे. मी प्रकल्प बघून आलो. 25 मजले तयार झाले असून 2 बीएचके तयार करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -