बऱ्याचदा अनेकांना बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र, दररोज बाहेरचे पदार्थ खाणे आरोग्यास अपायकारक असते. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला किंवा घरातील लहान मुलांसह मोठ्यांना भूक लागल्यास तुम्ही घरच्या घरी तयार केलेले पौष्टक लाडू नक्की देऊ शकता.
साहित्य :
1 वाटी कणिक
1 वाटी शेंगदाणा कूट
1 वाटी बारीक गूळ
1 वाटी तांदूळ
कृती :
- Advertisement -
- सर्वप्रथम तांदूळ मिक्सरमधून जाडसर बारीक करून घ्यावेत.
- त्यानंतर तांदळाचा रवा तूप टाकून परतून घ्यावा.
- त्यानंतर कणिक तूपावर चांगली खरपूस भाजून घ्यावी.
- तांदूळ आणि कणिक भाजल्यावर थंड व्हायला बाजूला ठेवावी.
- नंतर दोन्ही पदार्थ थंड झाल्यावर ते एकत्र करून त्यात शेंगदाणा कूट आणि 1 वाटी बारीक गूळ घालून सर्व पदार्थ एकत्र करून त्याचे लाडू वळायला घ्यावेत.
- तयार लाडवांचा आस्वाद घ्या.
हेही वाचा :
Recipe: ओव्हन शिवाय ‘असे’ बनवा रवा बिस्किट
- Advertisement -
- Advertisement -