Saturday, December 9, 2023
घरमानिनीHealthनको जीम नको डाएट,दोरी उड्या खेळा कॅलरीज बर्न करा

नको जीम नको डाएट,दोरी उड्या खेळा कॅलरीज बर्न करा

Subscribe

हेल्दी राहण्यासाठी वर्कआऊट करणे गरजेचे आहेच. पण रोजच्या धावपळीत ते सगळ्यांना शक्य होत नाही. अशांसाठी दोरीवरच्या उड्या हे वजन कमी करण्याबरोबरचं फिट राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे. कारण दोरी उड्या तुम्ही कुठेही आणि कधीही खेळू शकता. प्रामुख्याने महिलांसाठी दोरी उड्या हा उत्तम व्यायाम आहे. कारण या खेळामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

दोरी उड्यांमध्ये संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. कारण या खेळामध्ये आपले संपूर्ण शरीरच सक्रिय होते. मुख्यत्वे महिलांमध्ये कंबर,पोट आणि मांड्यावर वाढलेले फॅट्स दोरी उड्यांमुळे लवकर बर्न होतात. त्यामुळे वजन लवकर कमी होते.

- Advertisement -

हृदयासंबंधी रोगांपासून बचाव करण्यासाठीही दोरी उड्या हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे हृदयाची प्रक्रिया सामान्य होण्याबरोबरच शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांनाही हेल्दी ठेवता येते. यामुळे तज्त्रही रोज कमीत कमी १० मिनिट दोरी उड्या खेळण्याचा सल्ला देतात.

Can jumping rope burn fat? - Quora

- Advertisement -

दोरी उड्या हा असा एकमेव व्यायाम आहे ज्यात कमी वेळेत जास्तीत जास्त फॅट बर्न होतात. एका संशोधनानुसार एका दोरी उडीत २५ ते ३० कॅलरी बर्न होतात.

साधारणत दोरी उड्या आपण कधीही खेळू शकतो. पण असे असले तरी जेवल्यानंतर कमीत कमी दिड ते दोन तासानंतर दोरी उड्या खेळाव्यात. तसेच दोरी उड्या खेळण्याच्या अर्धा तास आधी हेवी डाएट करु नये.

पण मोड आलेली कडधान्य, सुका मेवा, यासारखे पदार्थाचे सेवन केल्याच्या ४० मिनिटांनंतर दोरी उड्या खेळाव्यात.


हेही वाचा :

हृदय चांगलं ठेवण्यासाठी योगा आहे फायदेशीर

- Advertisment -

Manini