पेन्शनसाठी NPS उत्तम पर्याय; उद्योजक आणि व्यवसायिकही घेऊ शकतात लाभ

पेन्शनसाठी NPS उत्तम पर्याय; उद्योजक आणि व्यवसायिकही घेऊ शकतात लाभ

संग्रहित छायाचित्र

निवृत्तीनंतर वृद्धापकाळात आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता देण्यासाठी केंद्रस सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना जानेवारी 2004 मध्ये सुरु केली. सेवानिवृत्ती नियोजनाच्यादृष्टीने हा एक चांगला दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. ही सरकारद्वारे चालवली जाणारी अंशदायी पेन्शन योजना आहे. एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टीम ही सेवानिवृत्ती निधी तयार करण्यासाठी खूप चांगली योजना आहे. ही योजना केवळ पगारदार लोकांसाठीच आहे, असे अनेकांना वाटते परंतु या योजनेचा लाभ व्यावसायिक, फ्रीलांसर, उद्योजक असाल तरी तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करुन पूर्ण लाभ घेऊ शकता.

NPS मध्ये चार क्षेत्रे आहेत

केंद्र सरकारी कर्मचा-यांसाठी

राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी

खासगी क्षेत्रातील कर्मचा-यांसाठी

सर्वसामान्य नागरिकांसाठी

NPS चा लाभ कोण घेऊ शकतं?

स्वयंरोजगार व्यवसायिकांमध्ये असा समज आहे की ते नियोक्त्यांच्या हाताखाली काम करत नसल्यामुळे निवृत्तीसाठी या योजनेत बचत करण्याचा पर्याय त्यांच्याकडे नाही. परंतु 18 ते 70 वयोगटातील कोणताही नागरिक नॅशनल पेन्शन सिस्टिममध्ये गुंतवणूक करु शकतात.

डाॅक्टर, वकिल, सीए, उद्योजक, वास्तुविशारद, पत्रकार, आचारी, फ्रीलन्सर यांसारखे व्यावसायिकही यामध्ये गुंतवणूक करु शकतात आणि स्वत:साठी निवृत्ती निधी तयार करु शकतात.

( हेही वाचा: Vastu Tips : शास्त्रात ‘या’ दिशेकडे तोंड करून जेवणे मानले जाते अशुभ )

NPS चे फायदे काय?

एनपीएसचे अनेक फायदे असून तुम्ही फंड मॅनेजर आणि तुमच्या आवडीचे फंड वाटप निवडू शकता. ग्राहक त्याच्या निधीतील 75 टक्के रक्कम इक्विटीमध्ये ठेवू शकतो. पेन्शन नियामक PFRDA नुसार एनपीएसने आपल्या ग्राहकांना बाजारानुसार, चांगला परतावा दिला आहे. तसेच, गेल्या दशकात त्याच्या ग्राहकांना कर सूट दिली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दोन लाखांपर्यंत थेट कर सूट मिळते. त्याची कमी किमतीची वैशिष्ट्ये तुम्हाला एक काॅर्पस तयार करण्यात मदत करतात ज्यामुळे तुम्हाला पेन्शनची रक्कम मिळते.

( हेही वाचा: फ्रिजमध्ये ठेवलेले कणिक काळं आणि कडक होतं? मग वापरा ‘या’ टीप्स )

First Published on: March 27, 2023 3:10 PM
Exit mobile version