Sunday, May 5, 2024
घरमानिनीKitchenThalipeeth Recipe : पालेभाजीचे पौष्टिक थालीपीठ नक्की ट्राय करा

Thalipeeth Recipe : पालेभाजीचे पौष्टिक थालीपीठ नक्की ट्राय करा

Subscribe

आतापर्यंत आपण भाजणीचे थालीपीठ खाल्ले असेल. पण आज आम्ही तुम्हाला पालेभाजीचे थालीपीठ कसे बनवतात, ते सांगणार आहोत. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या पालेभाजीचा वापर करुन पौष्टिक थालीपीठ तयार करु शकता.

साहित्य :

  • मेथी/पालक/शेपू यांपैकी कोणतीही पालेभाजी
  • ज्वारीचे पीठ
  • चना डाळीचे पीठ
  • कांदा बारीक चिरलेला
  • 4-5 मिरच्या
  • चवीनुसार मीठ

कृती :

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम भाजीत बसेल एवढी ज्वारीचे पीठ, थोडे, कांदा, चना डाळीचे पीठ घालावे आणि चवीनुसार मीठ, तिखट घालावे.
  • या सर्व मिश्रणामध्ये लागेल तसे पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
  • या पीठाचे लहान-लहान गोळे करून घ्यावे आणि ते थालीपीठाप्रमाणे थापून घ्यावे.
  • एकीकडे गॅसच्या मध्यम आचेवर तवा तापत ठेवावा. तवा तापल्यानंतर त्यात तेल किंवा तूप घालावे.
  • थापलेले थालीपीठ झाकण ठेऊन मध्यम आचेवर भाजून घ्यावे.
  • 5 मिनिटांनी झाकण काढून थालीपीठ दुसऱ्या बाजूने भाजून घ्यावे.
  • तयार थालीपीठ दह्यासोबत सर्व्ह करावे.

हेही वाचा :

Recipe : तुम्हीही बनवा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक हलवा

- Advertisment -

Manini