Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenतुमच्या Olive Oil मध्ये भेसळ तर नाही ना? अशी करा शुद्ध तेलाची...

तुमच्या Olive Oil मध्ये भेसळ तर नाही ना? अशी करा शुद्ध तेलाची पारख

Subscribe

ऑलिव्ह ऑइल खाण्यासाठी ते मालिशसाठी फार फायदेशीर मानले जाते. यामध्ये मोनअनसॅच्युरेटेड, ओमेगा-6 आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिडचे प्रमाण अधिक असते. याच कारणास्तव हृदय रोगाच्या रुग्णांसाठी ऑलिव्ह ऑइल आरोग्यासाठी हेल्दी मानले जाते. आपल्या औषधीय गुणांच्या कारणास्तव हे तेल अन्य तेलांच्या तुलनेत थोडं महागडे ही असते. परंतु तरीही याची मागणी खुप वाढली जात आहे. (Olive oil purity check tips)

अशातच कमी खर्चात ऑलिव्ह ऑइलचे तेल तयार करुन अधिक किंमतीत विक्री करणे सामान्य झाले आहे. यामध्ये भेसळ करुन सोयाबिनचे तेल मिक्स केले जाते. काही प्रकरणांत जुन्या स्टॉकमधील ऑलिव्ह ऑइल हे नव्या बॉटलमध्ये पॅक केले जाते आणि प्रीमियमच्या किंमतीत विक्री केले जाते. अशातच शुद्ध तेलाची ओळख करणे थोडंस कठीण होऊन जाते. परंतु ऑलिव्ह ऑइल तुम्ही सुद्धा वापरत असाल तर पुढील टीप्स जरुर वापरा.

- Advertisement -

लेबल तपासून पहा
ऑलिव्ह ऑइलच्या लेबलवर केवळ एक्सपायरी डेट लिहिलेली तपासून पाहणे पुरेसे नाही. याची शुद्धता तपासून पाहण्यासाठी NAOOA क्वालिटी सील सुद्धा तपासून पहा. हे एक ग्लोबल ऑलिव्ह ऑइल क्वालिटी अॅन्ड प्युरिटी स्टँडर्ड असते. या सीलवरुन असे कळते की, तेल विक्री करणारी कंपनी वर्षातून दोनवेळेस याची शुद्धता चेक करते. याचसोबत FFA चे प्रमाण ही चेक करा. प्रीमियम ऑलिव्ह ऑइलमध्ये याचा स्तर 0.2 पेक्षा अधिक नसते.

- Advertisement -

फ्रिजमध्ये ठेवून पहा
एक स्वच्छ कंटेनर घ्या आणि त्यात काही चमचे ऑलिव्ह ऑइल तेल टाका आणि बंद करुन कमीत कमी दिवस किंवा रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. जर तेल घट्ट झालं तर समजून जा ते शुद्ध आहे.या उलट तर जे घट्ट झाले नाही तर यामध्ये भेसळ केलेली असू शकते. ऑलिव्ह ऑइलच्या विविध वरायटीमुळे काही वेळेस याची टेस्ट उत्तम येईलच असे नाही.

गरम करुन पहा
ऑलिव्ह ऑइल गरम झाल्यानंतर ते त्यामधून अन्य तेलांप्रमाणे धूर निघत नाही. याची शुद्धता तपासून पाहण्यासाठी एका भांड्यात थोडावेळ ते गरम करुन पहा. (Olive oil purity check tips)

वास घेऊन पहा
ऑलिव्ह ऑइलच्या फळापासून तयार केले जाते. अशातच शुद्ध ऑलिव्ह ऑइलची तपासणी करण्यासाठी तुम्ही त्याचा वास घेऊ शकता. यासाठी तुम्ही ते एका वाटीत घेऊन त्याचा वास घेऊ शकता. जर यामधून फळ, भाजी किंवा तुरट गंध आल्यास तर समजून जा ते शुद्ध आहे.


हेही वाचा- Lemon hack : लिंबू महिनाभर टिकवण्यसाठी वापरा हे’ हॅक्स

- Advertisment -

Manini