चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करून पाहतो. पण हाताचा कोरडेपणा दूर करायला आपण काहीच वापरत नाही. यामुळे हाताची स्किन खूप खराब होते आणि डल दिसू लागते. यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून बघा. यामुळे तुमच्या हातांची त्वचाही मॉइश्चराइझ होईल. तसेच हात मऊ दिसतील. हे हॅन्ड स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरातल्याच काही वस्तूंची मदत घ्यायची आहे.
ऑलिव्ह ऑईल आणि साखर घालून स्क्रब बनवा
ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करते. याशिवाय ते डेड स्किनच्या पेशी सुधारतात. तसेच साखर हातांचा कोरडेपणा दूर करते.
ऑलिव्ह ऑइल आणि शुगर स्क्रब ‘असे’ वापरावे
- Advertisement -
- ऑलिव्ह ऑइल आणि शुगर स्क्रब बनवण्यासाठी प्रथम एक वाडगा घ्या.
- आता त्यात २ चमचे साखर आणि 1 चमचा ऑलिव्ह ऑईल घाला. नंतर हे मिश्रण चांगले मिसळा.
- त्यात लॅव्हेंडर तेल घालून घट्ट पेस्ट बनवा. आता ते हाताला लावून चांगले चोळा.
- 3 ते 5 मिनिटे हातावर राहू द्या.
- नंतर कोमट पाण्याने हात स्वच्छ करा.
- यामुळे तुमच्या त्वचेचा कोरडेपणा दूर होईल. त्यासोबतच हात देखील मऊ आणि छान होतील.
- तसेच जर का तुमची त्वचा खूपच ड्राय झाली आहे असे वाटत असेल तर यासाठी कॉफी आणि नारळ वापरू शकता.
- कॉफीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट त्वचेचा कोरडेपणा दूर करतात.
- हे त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास देखील मदत करते.
_________________________________________________________________________
हेही वाचा : चेहऱ्याला कन्सीलर लावताना ‘या’ टिप्स करा फोलॉ
- Advertisement -
- Advertisement -