Thursday, May 9, 2024
घरमानिनीRelationshipनववी, दहावीत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी काय काळजी घ्यावी

नववी, दहावीत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी काय काळजी घ्यावी

Subscribe

प्रत्येक शाळेत पालकसभा घेतली जाते. जेणेकरुन मुलं नक्की शाळेत कशी वागतात, त्यांची आवड अशा विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा केली जाते. पालकांना सुद्धा कळले पाहिजे की, आपल्या मुलांची आवड नक्की कशात आहे. जेणेकरुन भविष्यात तो त्याच करियरमध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. खरंतर आठवी, नववीतील मुलं ही अल्पवयीनच असतात. त्यांना या वयातच योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ही जबाबदारी पालकांची असते. (Parenting Tips)

पालकांनो घ्या या गोष्टी ठेवा लक्षात

- Advertisement -

-करियर प्लॅनिंगमध्ये मदत करा
यासाठी पालकांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यांनी नेहमीच शिक्षकांच्या संपर्कात राहिले पाहिजे. या व्यतिरिक्त मुलाची आवड कशामध्ये याबद्दल ही जाणून घेतले पाहिजे. पालकांनी मुलांना ८ वी पर्यंत त्यांच्या करियर प्लॅनिंगसाठी मदत केली पाहिजे.

-नव्या अॅक्टिव्हिटीजकडे दुर्लक्ष नको
ऐवढेच नव्हे तर मुलाला अभ्यासाऐवजी आणखी कोणत्या अॅक्टिव्हिटी आवडतात हे सुद्धा पालकांनी जाणून घेतले पाहिजे. जसे की, डान्स, सिंगिंग, स्विमिंग. तुम्ही जर मुलाला त्याची आवड विचारली तर त्याला आनंदच होईल आणि त्याचा आत्मविश्वास ही वाढेल. या व्यतिरिक्त पालकांनी त्याच्या करियरच्या प्लॅनिंगसाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे.

- Advertisement -

-योग्य मार्गदर्शन करा
अशा मुलांना पालकांनी सुद्धा योग्य मार्गदर्शन करावेच. पण करियर काउंसलरची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता. कारण योग्य करियर मार्गदर्शन मुलांना मिळणे हे फार महत्त्वाचे असते. त्याचसोबत मुलांसोबत कधीच उर्मट वागू नये आणि त्यांना समजून घेतले पाहिजे. असे केल्याने मुलं तुमच्यापासून काहीही लपवणार नाहीत.


हेही वाचा- वयात येणारी मुलं असतात हट्टी आणि चंचल, असे करा हॅण्डल

- Advertisment -

Manini