Tuesday, April 30, 2024
घरमानिनीRelationshipकोणत्या वयापर्यंत पालकांनी मुलांसोबत झोपावे?

कोणत्या वयापर्यंत पालकांनी मुलांसोबत झोपावे?

Subscribe

मुल जन्माला आल्यानंतर आईच्या कुशीत स्वत:ला सर्वाधिक सुरक्षित समजतं. त्यामुळे आईचा स्पर्श होताच ते लगेच शांत झोपी जातं.यामागे अनेक बायोलॉजिकल कारणे आहेत. पण मूलं लहान असेपर्यंत हे ठिक असते. मात्र बरेच पालक अतिप्रेम आणि अतिकाळजीमुळे मुल १४-१५ वर्षांचे झाल्यावरही त्याला त्यांच्यासोबत झोपायला लावतात. याचपार्श्वभूमीवर आपल्याकडे बऱ्याच घरांमध्ये मुलं पालकांबरोबरच एकाच बेडवर झोपतात. पण तज्त्रांच्या मते मूल जसजसे मोठे होत जाते तसतसे त्याच्यात अनेक शारिरीक आणि भावनिक बदल होत असतात. यामुळे वाढणाऱ्या मुलांना कधीही आपल्यासोबत झोपवण्याची चूक पालकांनी करू नये. तर त्यांचे वाढते वय मान्य करुन त्यांना स्वतंत्रपणे झोपायला लावावे. मुलाला वेगळ्या बेडवर किंवा वेगळ्या खोलीत झोपवण्याची सवय लावावी.

एका संशोधनानुसार पालकांनी मूलं तीन ते चार किंवा सात ते आठ वर्षांचे होईपर्यंतच त्यांच्यासोबत झोपावे.

- Advertisement -

त्यामुळे मुलाचे मनोबल वाढते.

पण त्यानंतर मुलाला पालकांपासून वेगळे झोपायला लावावे. कारण त्या वयात मूल प्री-प्युबर्टी स्टेजमध्ये असते, म्हणजे जेव्हा मुलामध्ये शारीरिक बदल होऊ लागतात, तेव्हा त्यांना स्वतंत्रपणे झोपायला लावावे.

- Advertisement -

मुलाचे वय वाढते असते. अशावेळी पालक त्याला घडवत असतात. पण जर अतिप्रेमापोटी पालक त्याला तो लहानचं असल्याचे सांगत राहीले तर त्याचे मुलाच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होतात.

अशा मुलांमध्ये आत्मविश्वास कमी असतो. ते पालकांवरच अवलंबून राहू लागतात. जे त्यांच्या भविष्यासाठी हानिकारक ठरू शकते.

संशोधनानुसार एका विशिष्ट वयानंतर पालकांसोबत झोपल्याने मुलांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात.

मुलं त्यांच्या पालकांसोबत झोपल्याने लठ्ठपणा, थकवा, कमी ऊर्जा, वाढ खुंटणे, हट्टीपणा, हेकेखोरपणा,आळस, नैराश्य आणि स्मरणशक्ती कमी होऊ शकते.

अशी मुलं पुढे आईवडिलांच्या अतिप्रेम आणि अतिकाळजीचा गैरफायदा घेऊ शकतात.

वर्षानुवर्षे पालकांसोबत झोपण्याच्या सवयीमुळे मुलाला वेगळे झोपणे कठीण होते.त्यांना मानसिक व्याधी जडू शकते.

वयाच्या चार-पाचव्या वर्षी पालकांपासून वेगळे पडण्याची सवय त्यांना वेगळी झोपायला मदत करते.

 

- Advertisment -

Manini