Thursday, April 18, 2024
घरमानिनीया वयातील मुलांना ओरडणे योग्य नाही!

या वयातील मुलांना ओरडणे योग्य नाही!

Subscribe

अनेकदा पालकांच्या नशिबी मस्तीखोर आणि त्रास देणारी मुले येतात. जी सतत मस्ती करत असतात. एकवेळ घरात मुलांनी केलेली मस्ती पालक समजून घेतात. त्यांच्याकडे सहसा दुर्लक्ष करतात. मात्र जेव्हा हीच मस्ती मुले बाहेर करतात तेव्हा मात्र कधी कधी पालकांना ते असह्य होते आणि सर्वांसमोर पालक मुलांना सुनावतात. कधी कधी त्यांच्यावर हातही उचलतात. पण खरंच अशाने मुलं घाबरतात का? तर त्याचे उत्तर आहे नाही.

काळाप्रमाणे प्रत्येक पिढी बदलत असते आणि आताच नवीन पिढी सुद्धा वेगळी आहे. हल्लीची मुलं जरी लहान असली तरी आसपास घडणाऱ्या व त्यांच्या नजरेस दिसणाऱ्या गोष्टींचा त्यांच्यावर अधिक परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्ही चार चौघात ओरडल्याने किंवा मारल्याने त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

- Advertisement -

मानसिक परिणाम

कोणत्याही मुलावर ओरडल्याने, मारल्याने मानसिक परिणाम हा सहज होऊ शकतो. अनेकदा असेही होऊ शकते की दुसऱ्याच्या चुकीमुळे किंवा गैरसमजामुळे मुलाला या प्रसंगाला सामोरे जावे लागते आणि ही गोष्ट अधिक घातक ठरते कारण आपण जे केलंच नाही त्याबद्दल आपला अपमान झाला ही भावना मुलाच्या मनात सतत सलत राहते. यामुळे मुलाच्या मनात आई वडिलांविरुद्ध अनेक वाईट विचार येऊ शकतात. जर मुलं आधीपासूनच मानसिकदृष्ट्या कमजोर असतील तर ती अधिकच खचून जाऊ शकतात.

मुलांशी मैत्री करा

मुले मोठी झाल्यानंतर त्यांचे पालक त्यांचे मित्र बनले पाहिजेत. त्यांना मित्रांसारखे वागवले पाहिजे. जर तुमचे वर्तन मैत्रीपूर्ण असेल तर मुले तुम्हाला काहीही सांगण्यास संकोच करणार नाहीत आणि ते तुमच्याशी सर्व काही शेअर करतील. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना त्यानुसार मार्गदर्शन करु शकता.

- Advertisement -

प्रेमाने समजावून सांगा

पौगंडावस्थेत मुले सहसा उत्साह आणि शक्तीच्या अभिमानामध्ये चुका करतात. चुकीचे मित्र बनवतात. अशा परिस्थितीत त्यांना खडसावू नये, तर प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करावा. निंदा केल्यामुळे त्यांना तुमच्याकडून एक शब्दही ऐकायला आवडणार नाही आणि ते तुम्हाला चुकीची उत्तरे देतील. म्हणून, मुलांना त्यांची चूक प्रेमाने समजावून सांगा जेणेकरुन ते पुन्हा ही चूक पुन्हा करणार नाहीत.

संवाद सुधारणे

तुमच्या आणि मुलामध्ये संवादाचे अंतर असले तरीही तुमची मुले तुमच्यापासून दूर असू शकतात. म्हणून, मुलांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्याशी उत्तम संवाद ठेवा. जेणेकरुन तुम्हाला त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठी गोष्ट माहीत असेल.

- Advertisment -

Manini