घरलाईफस्टाईलChildhood Obesity : मुलांमध्ये वाढतोय स्थूलपणा, वयानुसार किती असायला हवं वजन?

Childhood Obesity : मुलांमध्ये वाढतोय स्थूलपणा, वयानुसार किती असायला हवं वजन?

Subscribe

सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत जवळजवळ सगळ्यांच्याच खाण्या- पिण्याच्या आणि झोपण्याच्या सवयींमध्ये सतत बदल होऊ लागलेत. परिणामी वजन वाढणे यासारख्या लठ्ठपणाची समस्या सामान्य झाली आहे. पण ही समस्या फक्त मोठ्यांपर्यंत मर्यादीत राहीली नसून लहान मुलांमध्येही ती झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेंची बाब असून यामुळे कमी वयातच मुलांना मधुमेह तसेच हृदयासंबंधी विकार होण्याच्या शक्यताही वाढत आहेत.

तज्ज्ञांच्या मते लठ्ठपणाची अनेक कारणे आहेत. आनुवंशिक गुण हे देखील यातील एक कारणं असून खाण्याच्या पिण्याच्या चुकीच्या सवयी, तळलेले पदार्थांचे अतिसेवन, व्यायाम न करणे या देखील कारणांचा समावेश आहे. मात्र वाढत्या वजनावर योग्य वेळी नियंत्रण ठेवले नाही तर मधुमेह, उच्च रक्तदाब, , ऑस्टियोआर्थरायटिस, पित्त मूत्राशय कमकुवत होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयाशी संबंधित आजार आणि लहान मुलांमध्ये पोटाचे आजार होण्याचा धोका असतो.

- Advertisement -

एका रिपोर्टनुसार जगभरात आजच्या तारखेला एक कोटींहून अधिक मुलं स्थूल आहेत. हा आकडा वाढणारा असून पालकांनी मुलांची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी मुलांच्या डाएटकडे लक्ष द्यायला हवे. मुलांना भूक लागली म्हणून उठ सुठ हॉटेलचे पदार्थ, पि्झ्झा, बर्गरसारखे जंकफूड न देता घरचे पदार्थ द्यावेत. कोल्ड़ ड्रींक्स देऊ नयेत. मुलांना वाढत्या वयात पौष्टीक आहार द्यावा. फळभाज्या, पालेभाज्या द्याव्यात.

तसेच त्यांच्याकडून हलके व्यायामही करून घ्यायला हवेत. त्यामुळे मुलांचे वजन नियंत्रणात राहते. पण त्यासाठी आधी मुलांचे कोणत्या वयात किती वजन असावे हे समजून घ्यायला हवे.

- Advertisement -

कोणत्या वयात किती वजन आवश्यक आहे?

  • 1 वर्षाच्या मुलाचे वजन 10.2 किलो
  • 2 ते 5 वर्षाच्या मुलाचे वजन 12.3 ते 16 किलो
  • 3 ते 5 वर्षाच्या मुलाचे वजन 14 ते 17 किलो
  • 5 ते 8 वर्षाच्या मुलाचे वजन 20 ते 25 किलो
  • 9 ते 11 वर्षाच्या मुलाचे वजन 28 ते 32 किलो
  • 12 ते 14 वर्षाच्या मुलाचे वजन 37 ते 47 किलो

 

हेही पहा : Diabetes : डायबेटिस असणाऱ्यांसाठी ही फळं अपायकारक

___________________________________________________________________
Edited By : Nikita Shinde

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -