Thursday, May 9, 2024
घरमानिनीBeautyवॅक्सिंगनंतर रॅशेजच्या समस्येवर करा 'हे' घरगुती उपाय

वॅक्सिंगनंतर रॅशेजच्या समस्येवर करा ‘हे’ घरगुती उपाय

Subscribe

आजकाल वॅक्सिंगचा ट्रेंन्ड खुप आहे. महिला हातपायांसह फूल बॉडी वॅक्स सुद्धा करू लागल्या आहेत. वॅक्सिंगच्या वाढत्या डिमांडच्या कारणास्तव मार्केटमध्ये विविध प्रकारचे वॅक्स येऊ लागले आहेत. परंतु बहुतांश महिलांसाठी वॅक्सिंग करणे अत्यंत वेदनादायक ठरू शकते. काह महिलांमध्ये पोस्ट वॅक्स रॅशेज जसे की, लाल डाग, लहान-लहान बंम्प्स दिसून येतात.

वॅक्सनंतर काही घरगुती उपायांनी तुम्ही ही समस्या दूर करू शकता. यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागणार नाही. घर बसल्या काही उपचार करून तुम्ही वॅक्सिंग रॅशेजच्या समस्येपासून दूर राहू शकता.

- Advertisement -

-कोल्ड कंप्रेस
वॅक्सनंतर होणारे स्किन रॅशेज इन्फ्लेमेशनचे कारण ठरू शकतात. त्यामुळे यासाठी कोल्ड कंप्रेसचा वापर करू शकता. रॅशेजच्या ठिकाणी तुम्ही आइस पॅक अप्लाय करा. जर तो नसेल तर थंड बर्फाचे पाणी कॉटन कपड्यात बुडवून त्याने शेकवा. असे केल्याने तुम्ही बम्प्स आणि स्वेलिंगपासून दूर रहाल. त्याचसोब इरिटेशन, इचिंग, रेडनेस सुद्धा कमी करतील.

- Advertisement -

-एलोवेरा जेल वापरा
एलोवेरा जेलमध्ये कूलिंगसह हीलिंग प्रॉपर्टीज असतात. तुम्हाला पोस्ट वॅक्स बंम्प्स आले असतील तर एलोवेरा जेलची मदत घेऊ शकता. वॅक्सनंतर एलोवेरा जेल आपल्या त्वचेवर लावा. असे केल्याने बंम्प्स कमी होण्यासह इचिंग, रेडनेस आणि इरिटेशनपासून सुटका मिळेल.

-शुगर स्क्रब
घरीच तयार केलेला शुगर स्क्रब वापरल्याने तुमच्या त्वचेला इरिटेशन, इन ग्रोन हेयर आमि बंम्प्स पासून सुटका मिळेल. तो बनवण्यासाठी अर्धा कप शुगर मध्ये थोडं कोकोनट किंवा ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. ही पेस्ट ज्या ठिकाणी रॅशेज आले आहेत तेथे लावा. असे केल्याने तुम्ही या समस्येपासून दूर रहाल.

-टी ट्री एसेंशियल ऑइल
टी ट्री एसेंशियल ऑइल हे तुमच्या वॅक्स्ड स्किनसाठी फायदेशीर ठरेल. यामधील अँन्टीबॅक्टेरियल आणि अँन्टी फंगल प्रॉपर्टीज त्वचेवर होणारे इरिटेशन इचिंग आणि बंम्प्स पासून सुटका देतील. त्याचसोबत त्वचेवर ते अप्लाय करण्यापूर्वी कोकोनट किंवा ऑलिव्ह ऑइलसह डाइल्यूट करणे गरजेचे आहे.


हेही वाचा- आठवड्यातून एकदा फेस स्क्रब करण्याची ‘ही’ आहे योग्य पद्धत

 

- Advertisment -

Manini