Thursday, May 16, 2024
घरमानिनीRecipeउंदरांना घरातून पळवण्यासाठी घरगुती उपाय

उंदरांना घरातून पळवण्यासाठी घरगुती उपाय

Subscribe

घरातील किचनमध्ये बनवल्या जाणाऱ्या जेवणावर संपूर्ण परिवाराचे आरोग्य निर्भर असते. अशातच घरात जर उंदीर येत असतील तर तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. घरातील उंदरांना पळवण्यासाठी पिंजरा लावला जातो किंवा रॅट किलरचा वापर केला जातो. मात्र काही घरगुती उपायांनी सुद्धा तुम्ही उंदरांना घरातून पळवून लावू शकता. (Rat killer home remedies)

-तंबाखूचा वापर

- Advertisement -


तंबाखूचा वापर करून तुम्ही घरातील उंदरांना पळवून लावू शकता. यासाठी बेसनच्या पीठात तंबाखू मिक्स करुन त्याचे गोळे तयार करा आणि किचनमध्ये अशा ठिकाणी ठेवा जेथे उंदिर येतो. तंबाखूमध्ये असलेल्या काही अंमली पदार्थांमुळे उंदीर पळ काढतात.

-लाल मिर्ची

- Advertisement -


उंदरांना पळवून लावण्यासाठी लाल मिर्चीचा वापर करु शकता. यासाठी लाल मिर्ची किंवा त्याची पावडर अशा ठिकाणी ठेवा जेथे उंदीर येतात. असे केल्यानंतर पहा त्या ठिकाणी येतो की नाही.

-स्फटिक


उंदरांना स्फटिक अजिबात आवडत नाही. त्याच्या पावडरचे मिश्रण तयार करुन ते स्प्रे करा.

-कांद्याचा वापर


घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी तुम्ही कांद्याचा वापर करु शकता. कारण उंदरांना कांद्याचा वास अजिबात आवडत नाही. यासाठी तुम्ही कांद्याचे 7-8 तुकडे त्या ठिकाणी ठेवा जेथे उंदीर येतात.


हेही वाचा- किचनमध्ये रद्दी पेपरचा करा असा उपयोग

- Advertisment -

Manini