Friday, May 17, 2024
घरमानिनीRecipeकच्चा कांदा खाल्ल्यानंतर तोंडातून दुर्गंधी येत असेल 'या' टीप्स वापरा

कच्चा कांदा खाल्ल्यानंतर तोंडातून दुर्गंधी येत असेल ‘या’ टीप्स वापरा

Subscribe

कांदा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये काही पोषक तत्त्वे असतात. जसे की, सल्फर, पोटॅशिअम, जिंक असे. कांद्याचे सेवन केल्याने आपले शरीर काही रोगांपासून दूर राहते. कांद्याचा आपण जेवणात नेहमीच वापर करतो. कधी तो बारीक कापलेला, अख्खा किंवा लहान आकारात कापून वापरला जातो. आपण सलाद करतो तेव्हा सुद्धा कांदा वापरतो. मात्र तुम्ही नेहमीच नोटीस केले असेल की, कांदा खाल्ल्यानंतर तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. याच कारणास्तव एखाद्याशी बोलताना आता कसे बोलायचे असा प्रश्न पडतो. पुढील काही टीप्सने तुम्ही तोंडाची दुर्गंधी दूर करू शकता.

-लिंबूचा रस

- Advertisement -


जेवणासोबत आपण कधीकधी कांद्याचे सेवन करतो. अशातच कांदा खाल्ल्याने तोंडाला दुर्गंधी येऊ नये म्हणून तुम्ही आधीपासूनच कांदा लिंबाच्या रसात बुडवून ठेवू शकता. थोड्यावेळाने तुम्ही तो खाऊ शकता. अशा प्रकारचा कांदा खाल्ल्यास त्यामुळे दुर्गंधी येणार नाही.

बडीशेप

- Advertisement -


जेवताना कांदा खात असाल तर जेवणानंतर बडीशेप खाऊ शकता. असे केल्याने तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होईल. खरंतर बडीशेपमध्ये एरोमॅटिक गुण असतात. त्यामुळे याला माउथ फ्रेशनरच्या रुपात वापर केला जाऊ शकतो. बडीशोप चावून खाल्ल्याने तोंडाला कांद्यामुळे येणारी दुर्गंधी दूर होईल.

-वेलची


वेलची सुद्धा माउथ फ्रेशरच्या रुपात वापरली जाऊ शकते. ही तुमच्या ओरल हेल्थसाठी फायदेशीर असते. वेलचीचा सुगंध फार असतो. वेलची खाल्ल्यानंतर तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होईल. त्याचसोबत पाचक एंजाइम्स वाढले जातील.


हेही वाचा- Kitchen Tips : किचन साफ करताना ‘या’ टिप्स करा फॉलो…

- Advertisment -

Manini