Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenRecipe : मिक्स कडधान्याचे हेल्दी सॅलेड

Recipe : मिक्स कडधान्याचे हेल्दी सॅलेड

Subscribe

शरीराला पुरेसे पोषकतत्व मिळण्यासाठी भाज्यांप्रमाणेच कडधान्य खाणं देखील गरजेचं आहे. जे व्यक्ती नियमित व्यायाम करतात. त्यांच्या डाएटमध्ये कडधान्यांचा सर्वाधिक समावेश असतो. पण कधी-कधी कडधान्य खायला कंटाळा येतो, अशावेळी तुम्ही कडधान्याचे सॅलेड नक्की ट्राय करु शकता.

साहित्य :

  • 1/2 वाटी मोड आलेले मूग
  • 1/2 वाटी मोड आलेली मटकी
  • 1/2 वाटी भिजवलेले चने
  • 1/2 अर्धी वाटी डाळींबाचे दाणे
  • 1/2 वाटी बारीक चिरलेला कांदा
  • 1/2 वाटी बारीक चिरलेला टॉमेटो
  • 1/2 वाटी बारीक चिरलेली काकडी
  • 1 चमचा लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ

कृती :

Sprouted Moong Dal Salad | Tasty and super Healthy - YouTube

- Advertisement -
  • सर्वप्रथम सर्व कडधान्ये अर्धवट शिजवून घ्यावीत.
  • नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, काकडी, टोमॅटो,मीठ,डाळींबाचे दाणे आणि लिंबाचा रस पिळावा.
  • हे सर्व मिश्रण एकजीव करावे. कडधान्याचे सॅलेड खाण्यास द्यावे.

हेही वाचा :

Recipe : मसाला कांदा

- Advertisment -

Manini