घरमहाराष्ट्रAmol Mitkari : जरा आपला इतिहास पहावा..., अमोल मिटकरींनी किरण मानेंना सुनावले

Amol Mitkari : जरा आपला इतिहास पहावा…, अमोल मिटकरींनी किरण मानेंना सुनावले

Subscribe

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल अभिनेता आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोचरी टीका केली आहे. यावरून अजित पवार समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. किरण माने यांनी आपला इतिहास पाहावा, असे त्यांनी सुनावले आहे.

हेही वाचा – Loksabha 2024 : एकनाथ शिंदेंची अडचण होऊ नये म्हणून…; विजय शिवतारे लवकरच करणार मोठी घोषणा

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र राज्यात महायुतीचे जागावाटप झालेले नाही. महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा सोडायचे हे ठरत नाही, अशी स्थिती आहे. तर दुसरीकडे, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून भाजपासोबत गेले आहेत, तर उदयनराजे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

- Advertisement -

या दोन्ही नेत्यांना आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे जाऊन आपल्या मागण्या मांडाव्या लागत आहेत. मात्र अमित शहा उदयनराजे यांना भेटीसाठीही वेळ देत नसल्याच्या बातम्या येत आहेत. तर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनाही फैलावर घेणारे अजित पवार यांना अमित शहा यांच्यापुढे हतबल होऊन उभे राहिलेले पाहून वाईट वाटत असल्याचे किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. मराठी माणसांचा अभिमान असणाऱ्या नेत्यांचा अपमान असाच चालू राहिला तर आपल्याला लवकरच जय गुजरात म्हणण्याची वेळ येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Chitra Wagh : स्वतःच्या कौतुकाचा कशिदा कितीही विणला तरी…; चित्रा वाघ यांची ठाकरेंवर टीका

यावर आमदार अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. लाचार वगैरे शब्द वापरताना जरा आपला इतिहास पहावा, असे त्यांनी किरण माने यांना सुनावले आहे. उद्धव ठाकरे यांच्या दारी लाचारी करून का आणि कसे गेलात, ते सगळ्यांना ठाऊक आहे. आपली लढाई लढायला आपल्याला खासदार शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांचा सहारा लागतो, यातच आपली कुवत कळते. फुकटचे सल्ले आपण स्वतःजवळ ठेवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – NCP : महायुतीतील नेत्यांची पक्षांतर्गत अदलाबदली; शिरुरसाठी अढळराव 26 तारखेला राष्ट्रवादीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -