Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Kitchen Recipe: झटपट होणारा निलंगा राईस

Recipe: झटपट होणारा निलंगा राईस

Subscribe

मराठवाड्यातील प्रसिद्ध असा निलंगा राईस तेथे आवडीने खाल्ला जातो. अशातच तुम्हाला घरच्या घरी एखादी राईसची नवी रेसिपी बनवायची असेल तर झटपट तयार होणारा निलंगा राईस एकदा नक्की ट्राय करून पहा.

Pin on Breakfast Recipes

- Advertisement -

साहित्य-
1 1/2 कप चांद तारा रासइ (नसल्यास घरी असलेला तांदूळ)
1 1/4 कप मसूर डाळ
1 चमचा मिरची पेस्ट
1 कांदा,
2 लहान टॉमेटो,
1 बटाटा,
1 लहान तुकडा आलं
1 चमचा लाल तिखट,
1 चमचा हळद,
1 चमचा तूप
4 लसूण पाकळ्या
तेल,मीठ आवश्यकतेनुसार

निलंगा राईस | लातूर प्रसिद्ध चमचमीत भात | Spicy Nilanga Rice |  MadhurasRecipe 539 - YouTube

- Advertisement -

कृती-

सर्वात प्रथम कांदा, बटाटा, टॉमेटो बारीक कापून घ्या. असे केल्यानंतर गॅस वरील एका कुकर मध्ये आधी तेल टाका. त्यात कांदा,खिसून आलं, लसूण टाकून चांगलं परतुन घ्या. त्यात लाल तिखट, हळद,मीठ टॉमेटो,बटाटा मसूर मिक्स करा. आता त्यामध्ये त्यात धुवून तांदूळ घाला आणि शिजविण्यासाठी थोडे पाणी घाला आणि झाकण लावून 2 शिट्या काढा. यार झालेल्या भातावर वरून तूप घाला. अशा प्रकारे आपला तयार होईल निलंगा राईस.

- Advertisment -

Manini