Saturday, September 30, 2023
घर मानिनी Kitchen Recipe: ओव्हन शिवाय 'असे' बनवा रवा बिस्किट

Recipe: ओव्हन शिवाय ‘असे’ बनवा रवा बिस्किट

Subscribe

चहासोबत काहीतरी चविष्ट आणि हेल्दी बिस्किटचा ऑप्शन पाहत असाल तर रवा बिस्किट परफेक्ट आहे. रवा बिस्किट तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. यासाठी फार काही करावे ही लागत नाही. तसेच यासाठी अंड, बेकिंग सोडा याची सुद्धा गरज नसते. चला तर पाहूयात रवा बिस्किटची रेसिपी सविस्तरपणे. हे स्वादिष्ट असे रवा बिस्किट्स ओव्हन किंवा मायक्रोवेव मध्ये घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. यासाठी केवळ 30 मिनिटेच लागतात.

- Advertisement -

रेसिपी
-एका मोठ्या भांड्यात तूप, साखर आणि गरम दूध फेटून घ्या
-रवा, मैद्याचे पीठ, मिल्क पावडर, मीठ, वेलची आणि सुकं खोबर
-सर्व गोष्टी एकत्रित मिक्स करुन घ्या आणि ते मिश्रण 10 मिनिटांसाठी तसेच ठेवा
-आता मिश्रण हळूहळू मळून घ्या, जो पर्यंत तो मऊ होत नाही. असे केल्यानंतर पीठाचे लहान-लहान गोल तयार करून घ्या
-प्रत्येक गोळा हा चपट करून ते एका ट्रेवर ठेवा
-आता कढाईत शॅलो फ्राय करण्यासाठी तेल गरम करा. एकदा तेल गरम झाल्यानंतर त्यात ते गोळे टाका
-बिस्किट पलटून पाहत रहा, जेणेकरुन ते चिकटले जाणार नाहीत.
-जेव्हा ते गोल्डन-ब्राउन रंगाचे होतील तेव्हा ते कढाईतून काढा आणि थंड होण्यासाठी ठेवा.
-अशा प्रकारे तुमचे रवा बिस्किट्स तयार होतील.


हेही वाचा- Fruits Salad : झटपट बनवा होममेड फ्रूट सलाड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini