Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र 'खड्डे बुजवा अन्यथा टोल भरणार नाही' नाशिकच्या उद्योजक संघटना आक्रमक

‘खड्डे बुजवा अन्यथा टोल भरणार नाही’ नाशिकच्या उद्योजक संघटना आक्रमक

Subscribe

नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. याचा फटका आता प्रवाशांसोबत व्यापार्‍यांनही बसू लागला आहे. त्यामुळे प्रचंड वैतागलेल्या २६ हून अधिक व्यापारी संघटनांनी खड्डे बुजवेपर्यंत टोल भरणार नाही, असा इशारा दिला आहे. यात व्यापारी, उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांचा समावेश आहे. मुंबईला जाण्यासाठी पाच ते सहा तास लागतात, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनेही खराब होतात, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

वाहतूक मार्गात अडथळे ठरणारी अतिक्रमणे काढावीत, हवाईसेवेचे व्यापक जाळे विणावे, तसेच नाशिकहून मुंबईसाठी जलद रेल्वेसेवा सुरू करावी यांसह जिल्ह्याच्या विकासाला पूरक विविध मागण्यांवर संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष, क्रेडाईचे हितेश पोद्दार, नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य, निपमचे हेमंत राख, चेंबरचे कांतिलाल चोपडा, लघुउद्योग भारतीचे विवेक कुलकर्णी, निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, तान संघटनेचे सागर वाकचौरे, प्रॅक्टिशनर इंजिनिअर असोसिएशनचे अनिल कडभाने आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत शहर, जिल्ह्यातील रस्त्यांच्या दूरवस्थेबाबत उपस्थित प्रतिनिधींच्या भावना तीव्र होत्या. मुंबईला जायला आठ-आठ तास लागत असतील तर ते आम्ही कसे खपवून घ्यायचे, असा संतप्त सवालही पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला.

या आहेत मागण्या 

  • वंदे भारतच्या धर्तीवर नाशिक मुंबई जलद रेल्वे सुरू करावी
  • नाशिक-मुंबई लोकलसेवेचे जाळे व्यापक करावे
  • बाह्य रिंगरोडला त्वरीत मंजुरी मिळावी
  • बंद जकात नाक्यांजवळ ट्रक टर्मिनस उभारावे
  • वाहतूक कोंडी कमी करण्यास सार्वजनिक सेवेवर सर्वांनी भर द्यावा
  • ओझर विमातळावर जाण्यासाठी बस कनेक्टिविटी हवी
  • आयएएम महाविद्यालये सुरू व्हावीत
  • उद्योजकांची सनद तयार करावी
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -