Thursday, May 16, 2024
घरमानिनीRecipeFruits Salad : झटपट बनवा होममेड फ्रूट सलाड

Fruits Salad : झटपट बनवा होममेड फ्रूट सलाड

Subscribe

सलाड हा कधीपण खाल्ला जाणार पदार्थ आहे. तसेच शरीराला फायदेशीर असणारे सलाड रोजच्या रोज खायला हवेत. यामुळे शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची कमी भासणार नाही. अशातच सलाड बनवण्यासाठी जास्त वेळ देखील तुम्हाला लागत नाही. झटपट फ्रूट्स सलाड बनवण्यासाठी जाणून घ्या साहित्य आणि कृती…

साहित्य

  • सफरचंद – 1
  • काकडी – 1
  • पपई – 1 कप
  • डाळिंबाचे दाणे – 1 कप
  • स्प्राउट्स – 1 कप
  • द्राक्षे – 1 कप
  • लिंबाचा रस – 1 टीस्पून
  • काळी मिरी पावडर – चवीनुसार
  • कोथिंबीर बारीक चिरलेली –
  • 1 टीस्पूनमीठ – चवीनुसार

True Orange Fruit Salad – True Citrus

कृती

  • फ्रूट सॅलड बनवण्यासाठी प्रथम पपई, सफरचंद आणि काकडी घ्या आणि त्यांचे छोटे तुकडे करा.
  • आता एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यात कापलेली फळे घाला आणि चांगले मिक्स करून घ्या.
  • एका भांड्यात पाणी घाला आणि मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा.
  • पाणी गरम झाल्यावर त्यात स्प्राउट्स (प्रथिने) टाका आणि उकळवा.  नंतर स्प्राउट्स मऊ झाल्यावर गॅस बंद करा.
  • यानंतर, गाळणीच्या साहाय्याने स्प्राउट्समधील पाणी काढा आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवा.
  • 5 मिनिटांत स्प्राउट्स पूर्णपणे थंड होतील. यानंतर स्प्राउट्स फळांमध्ये मिसळा.
  • आता भांड्यात काळी मिरी पावडर, एक चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ मिसळा.
  • मसालेदार चव येण्यासाठी यावरर चाट मसाला देखील घालू शकता.
  • फळांचा चाट बनवण्यासाठी हंगामी फळांचा वापर करा.

हेही वाचा : Recipe: चना जोर गरम भेल

- Advertisment -

Manini