Thursday, May 9, 2024
घरमानिनीRelationshipआईच्या 'या' चुकांमुळे मुलीच्या सासरी होतो वाद

आईच्या ‘या’ चुकांमुळे मुलीच्या सासरी होतो वाद

Subscribe

प्रत्येक आईसाठी आपली मुलगी फार प्रिय असते. त्यामुळे लग्नाआधी ती तिचे ऐवढे लाड करते की, सर्वकाही गोष्टी तिच्या हातात सुद्धा आणून देण्यास मागे पुढे पाहत नाही. पण जेव्हा तिचे लग्न होते तेव्हा मुलीला आपल्यापासून दूर जाताना फार रडतात. त्यांना असे वाटत राहते की, मुलीशी सतत बोलावे. मात्र आईच्या कधीकधी अधिक काळजीपोटी मुलीच्या सासरी काही बिघडू शकतात हे सुद्धा लक्षात घ्यावे. अशातच आई नकळतपणे अशा कोणत्या चुका करते त्यामुळे मुलीच्या सासरी वादाची स्थिती निर्माण होते याच बद्दल पाहूयात. (Relationship tips)

-वारंवार फोन करणे
मुलीला सासरी पाठवल्यानंतर आईला खुप बैचेन झाल्यासारखे वाटत राहते. अशातच आपली मुलगी सासरी काय करतेय हे जाणून घेण्यासाठी ती दिवसभरातून चार-पाच वेळा तरी फोन करतेच. परंतु आईला हे कळले पाहिजे की, सासरी मुलीला अॅडजेस्ट होण्यासाठी अधिक वेळ द्यावा. तुम्ही जर वारंवार तिला फोन करत राहिलात तर नव्या परिवाराला ती कधी वेळ देणार?

- Advertisement -

-मुलीला सासरी काम न करण्याचा सल्ला
असे म्हटले जाते की, मुलगी सासरी गेल्यानंतर तेच तिचे घर असते. याचा अर्थ असा ही होतो की, तिला जबाबदाऱ्या आता व्यवस्थितीत पार पाडायच्या असतात. अशातच मुलीने जर सासरी काम केले तर त्यात काय चुकीचे आहे. यामुळेच आईने आपल्या मुलीला सासरी काम न करण्याचा सल्ला देण्याची चूक करु नये.

- Advertisement -

-नवऱ्याला परिवारापासून वेगळे राहण्यास सांगा
प्रत्येक आईला वाटते की, तिच्या मुलीने लग्न केल्यानंतर तिने कोणत्याही समस्येचा सामना करु नये. तिने एखाद्या राणी सारखे सासरी रहावे. तिने कोणतेही काम करु नये. पण जेव्हा असे होत नाही तेव्हा बहुतांश आई या आपल्या मुलीला नवऱ्याला आपण वेगळं राहूयात यासाठी पाठी लागण्यास सांगते. यामुळे सुद्धा सासरी वाद होऊ शकतात.

-वारंवार तिला माहेरी बोलावणे
मुलगी जेव्हा सासरी रुळते तेव्हा तिची माहेरची ओढ कमी होते. तेव्हा ती आपल्या नवऱ्याला, तेथील मंडळींना आपला परिवार मानू लागते. पण याच दरम्यान सतत तिला माहेरी बोलावणे चुकीचे आहे.

-जावयाला टोमणे मारणे
कोणत्याही आईने आपल्या जावयाला या गोष्टीवरुन टोमणे मारु नयेत की, माझी मुलगी सतत तुझ्या घरी कामच करत असते. असे बोलल्याने माहेरच्या मंडळींशी असलेले जावयाचे नाते बिघडू शकते. उलट तुमची मुलगी चुकतेय का हे आधी पहावे.


हेही वाचा- सासू-सुनेचे नातेसंबंध कसे असावेत?

- Advertisment -

Manini