Friday, May 17, 2024
घरमानिनीRelationshipपार्टनर असावा तर असा...

पार्टनर असावा तर असा…

Subscribe

कोणालाच माहिती नसते तर त्याला कधी आणि केव्हा प्रेम होईल. पण जेव्हा एखाद्यावर प्रेम जडते तेव्हा आपण सर्वकाही विसरुन त्याला अधिक महत्व दिले जाते. रिलेशनशिपमध्ये चुक-बरोबर, योग्य-अयोग्य हे सुद्धा पाहिले जात नाही. तसेच पार्टनर बद्दल एखाद्याने वाईट बोलले तर खपवून घेतले जात नाही. रिलेशनशिपमध्ये पुढे गेल्यानंतर खुप काही गोष्टी बदलल्या जातात. त्यामुळे सुरुवातीला तुमचे नाते होते तसेच ते कायम राहिल असे होत नाही. त्यामुळे जर तुम्ही परफेक्ट लाइफ पार्टनरच्या शोधात असाल तर त्यामध्ये कोणते गुण असावेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Perfect partner)

मानसिक परिक्वता
प्रत्येकजण हा परफेक्ट नसतो. अशातच जर तुम्ही परफेक्ट पार्टनरच्या शोधात असाल तर तो पटकन मिळेलच असे नाही. तुम्हाला परफेक्ट पार्टनर मिळेल किंवा नाही. पण पार्टनर हा मानसिक परिक्व असला पाहिजे. त्याचे वागणे लहान मुलासारखे नसावे. खुल्या विचारांचा असावा आणि तुम्हाला भावनिक सपोर्ट करणारा असावा.

- Advertisement -

ईमानदार
नात्यात ईमानदारी फार महत्वाची असते. त्यामुळे तुमचा पार्टनर ईमानदार असेल तर तुमचे नाते दीर्घकाळ टिकून राहिल. परंतु तो तुमच्यासमोर फार गोडं गोडं बोलत असेल आणि तुमच्या मागे वेगळा वागत असेल तर तो तुम्हाला फसवतोय हे लक्षात घ्या.

- Advertisement -

संवदेनशील
तुम्ही अशा व्यक्तीसोबत आयुष्य घालवू शकत नाहीत जो तुमच्या गरजा आणि भावना समजून घेत नाही. थोडा विचार करा की, अशा पुरुषासोबत तुम्ही तुमचे आयुष्य घालवू शकता का? तुम्ही पार्टनर निवडताना तो संवेदनशील असावा. त्याने तुमचा इतरांसमोर ही आदर ही केला पाहिजे. (Perfect partner)

सन्मान
सन्मान हा असा गुण आहे जो नात्याचा महत्वाचा दोर मानला जातो. त्यामुळे नेहमीच अशा व्यक्तीचा निवड करा, जो तुमचा सन्मान करेल. जो तुमची कदर करत असेल. तुमच्या यशामुळे त्याला आनंद वाटला पाहिजे. खासगी आयुष्य असो किंवा करियर संबंधित काही गोष्टी, त्याने तुमच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे.


हेही वाचा- लग्नानंतर आयुष्य कंटाळवाणे होणार नाही, तुमच्या जोडीदारासोबत असा वेळ घालवा

- Advertisment -

Manini