घरक्रीडाAsia Cup 2023 : आशिया चषकाच्या तारखा जाहीर; भारत-पाकिस्तानदरम्यान 'या' देशात होणार सामना

Asia Cup 2023 : आशिया चषकाच्या तारखा जाहीर; भारत-पाकिस्तानदरम्यान ‘या’ देशात होणार सामना

Subscribe

Asia Cup 2023 : नवी दिल्ली : आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) ला 31 ऑगस्टपासून सुरूवात होणार असून ही स्पर्धा 17 सप्टेंबरपर्यंत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील 13 सामने भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहेत. यावेळी ही स्पर्धा ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गत होणार आहे. या स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत, तर उर्वरीत 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. (Asia Cup 2023 : Asia Cup Dates Announced; The match between India and Pakistan will take place in this country)

आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली होती, मात्र भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास विरोध केला. यानंतर आयसीसीने नवीन ‘हायब्रीड मॉडेल’ आणले आणि भारत-पाकिस्तानसोबत इतर देशानीही या मॉडेलला सहमती दर्शविली. त्यामुळे अनेक दिवसांपासून भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेला वाद आता पूर्णपणे मिटला आहे. आता आशिया चषक दोन देशांमध्ये आयोजित केली जाणार आहे. पाकिस्तानमध्ये चार सामने होतील, तर उर्वरित नऊ सामने श्रीलंकेत होणार आहेत. आशिया चषकामध्ये सर्व 6 संघांना दोन गटात विभागले गेले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ट्विट करून स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या आहेत, मात्र स्पर्धेतील सामन्यांचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

- Advertisement -

आशिया चषकासाठी बुमराह-अय्यरला संधी मिळण्याची शक्यता
आशिया चषक 2023 च्या तारखा जाहीर झाल्यानंतर भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर लवकरच भारतीय संघात पुनरागमन करू शकतात. हे दोन्ही खेळाडू  दुखापतीमुळे बराच काळ भारतीय संघातून बाहेर होते. दुखापतीनंतर बुमराह आणि अय्यरवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे वैद्यकीय कर्मचारी या दोन्ही खेळाडूंची तपासणी करणार आहेत.

बुमराह-अय्यरवर शस्त्रक्रिया झाली असून दोघेही फिजिओथेरपी घेत आहेत
बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली आहे. यासाठी तो मार्चमध्ये न्यूझीलंडला गेला होता. श्रेयस अय्यरही पाठीच्या खालच्या बाजूच्या समस्येतून बाहेर पडत आहे. अय्यरवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. हे दोघेही फिजिओथेरपी घेत आहे. अय्यरने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च 2023 मध्ये खेळला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -