Wednesday, May 15, 2024
घरमानिनीRecipeShravan Recipe : श्रावणात ट्राय करा गूळ-खोबऱ्याच्या सारोट्या

Shravan Recipe : श्रावणात ट्राय करा गूळ-खोबऱ्याच्या सारोट्या

Subscribe

श्रावण महिना म्हटला की, सण-समारंभाप्रमाणे गोड खाण्याचे दिवसही सुरू होतात. अशावेळी काय खावे असा अनेकांना प्रश्न पडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला श्रावण स्पेशल अशी गोड रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य :

  • 1 वाटी बारीक रवा
  • 1 वाटी तीळ
  • 1/2 वाटी शेंगदाणे
  • 1/2 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस
  • 1 वाटी गूळ
  • 1 चमचा वेलची पूड
  • तूप

कृती :

Obbattu | Karnataka Style Holige | Karnataka Tourism

  • सर्वप्रथम रव्यात 1 चमचा गरम तूप घालून ते पाण्याने मळून घ्यावे आणि बाजूला ठेवावे.
  • त्यानंतर तीळ मंद आचेवर भाजून घ्यावेत. त्यानंतर शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कीसदेखील भाजून घ्यावा.
  • तीळ आणि शेंगदाण्याचे कूट एकत्र बारीक करून घ्यावे आणि गूळ बारीक किसून घ्यावा.
  • आता तीळ आणि शेंगदाण्याचे कूट, खोबऱ्याचा कीस आणि गूळ एकत्र करून हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये एकत्र बारीक करून घ्यावे.
  • आता बारीक केलेल्या तयार मिश्रणात वेलची पूड देखील घालावी.
  • आता दुसरीकडे भिजवलेल्या रव्याचे बारीक गोळे करावे आणि प्रत्येक गोळ्याची पारी करून त्यात 1 चमचा तीळ-खोबऱ्याचं मिश्रण घालून सारोट्या हलक्या हाताने सारोट्या लाटून घ्याव्या.
  • नंतर गरम तव्यावर तूप टाकून सारोट्या खरपूस भाजून घ्याव्या.

हेही वाचा :

श्रावण सुरु होतोय ‘पाकातल्या पुऱ्या’ नक्की ट्राय करा

- Advertisment -

Manini