Saturday, May 18, 2024
घरमानिनीRecipeShravan Recipe : श्रावणात ट्राय करा पुरणाची करंजी

Shravan Recipe : श्रावणात ट्राय करा पुरणाची करंजी

Subscribe

श्रावण महिना म्हटला की, सण-समारंभाप्रमाणे गोड खाण्याचे दिवसही सुरू होतात. अशावेळी काय खावे असा अनेकांना प्रश्न पडतो. श्रावण महिन्यातल्या सणासुदीच्या दिवशी हे पुरणाची करंजी तुम्ही नक्की ट्राय करु शकता.

साहित्य :

  • 1 कप चण्याची डाळ
  • 1 कप चिरलेला गूळ
  • 1 कप गव्हाच पीठ
  • 2 चमचे रवा
  • जायफळ पावडर
  • वेलेची पावडर
  • तेल आणि मीठ

कृती :

PURANACHE KADBU | पुराणाचे कडबू | kadabu - YouTube

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम चण्याची डाळ 3-4 वेळा धुवून घ्या. त्यानंतर दोन किंवा पावने दोन कप डाळीत पाणी घाला. मग त्यामध्ये थोडी हळद घालून ती शिजवून घ्या.
  • डाळ शिजेपर्यंत करंजीच्या बाहेरचे आवारणासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाच्या पीठात तेल, रवा आणि मीठ घालून कणीक मळून घ्या.
  • गव्हाचे पीठ मळून झाल्यानंतर ते 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवा. शिजून झालेल्या डाळीचं पाणी एका भांड्यात काढून घ्या.
  • पुरण शिजवण्यासाठी पहिल्यांदा गॅसवर कढई ठेवा. त्यानंतर कढईत शिजलेली डाळ आणि गूळ घाला. त्यानंतर ते मिश्रण हालवत राहा. 6 ते 7 मिनिटांत हे डाळीच मिश्रण शिजवा.
  • आता हे मिश्रण बारीक करा आणि त्यानंतर त्यात झाल्यानंतर वेलची पावडर, जायफळ पावडर आणि चवीनुसार मीठ घाला.
  • हे सर्व झाल्यानंतर मळलेल्या गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे करुन घ्या. गोळे तयार झाल्यानंतर एक गोळा घेऊन तो पूरी सारखा लाटा आणि त्यामध्ये डाळीचे बारीक मिश्रण घालून करंजीच्या आकारत ते कापून घ्या.
  • आता गरम तेलामध्ये हे करंजी तळून घ्या. यालाच पुरणाचे कडबू देखील म्हणतात.

हेही वाचा :

Shravan Recipe : श्रावणात ट्राय करा गूळ-खोबऱ्याच्या सारोट्या

- Advertisment -

Manini