Saturday, May 4, 2024
घरमानिनीKitchenShravan Recipe : उपवासासाठी खास पनीर कटलेट रेसिपी

Shravan Recipe : उपवासासाठी खास पनीर कटलेट रेसिपी

Subscribe

श्रावण महिन्यात अनेकांचे उपवास असतात. अनेकजण उपवासाच्या दिवशी केवळ फलाहार करतात. मात्र, अनेकांना केवळ फलाहार करणं जमत नाही. अशावेळी वेफर्स आणि इतर साबुदाण्याची खिचडी खाण्याऐवजी तुम्ही उपवासाचे पनीर कटलेट ट्राय करु शकता.

साहित्य :

  • 1/2 कप शिंगाड्याचे पीठ
  • 250 ग्रॅम ताजे पनीर
  • 2-3 हिरव्या मिरच्या
  • 1/2 लिंबाचा रस
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीप्रमाणे मीठ

कृती :

🍛 Peas and Paneer Cutlets | Indian | Vegetarian | Recipe

  • सर्वप्रथम पनीर चांगले किसून घ्यावे. त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.
  • आता शिंगाड्याचे पीठ बारीक चाळणीने चाळून घ्या आणि त्यामध्ये किसलेले पनीर आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मिसळून घ्या.
  • त्यामध्ये लिंबाचा रस, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. त्याचे कटलेट बनवून घ्या.
  • आता तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूने खमंग परतून घ्या.
  • तयार कटलेट हिरवी चटणी किंवा दह्या सोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Shravan Recipe : श्रावणाच्या उपवासात ट्राय करा बटाट्याचे आप्पे

- Advertisment -

Manini