Monday, September 25, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Kitchen Shravan Recipe : झटपट बनवा केळ्याचे रायते

Shravan Recipe : झटपट बनवा केळ्याचे रायते

Subscribe

सध्या श्रावण महिना सुरु आहे. या महिन्यात बऱ्याच जणांचे उपवास असतात.  मात्र, सतत साबुदाणा खिचडी, फळं खाऊन कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी वेगळे खावेसे वाटते. अगदी झटपट आणि चविष्ट पदार्थ आपण बनवु शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केळ्याचे रायते कसा बनवायचा हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 4 पिकलेली केळी
  • 1/2 कप वाळलेले बारीक खोबरे
  • 1 चमचा बारीक कापलेले बदाम
  • 1 लिंबू
  • 1 कप दही

कृती :

Kela Anar Raita Recipe (Banana Pomegranate Yogurt Dip Flavoured With Mustard) by Archana's Kitchen

  • सर्वप्रथम वाळलेले बारीक खोबरे तांबुस होईपर्यंत भाजून घ्या.
  • त्यानंतर केळ्यांचे काप करा. त्या कापांना लिंबाचा रस चांगला लावा म्हणजे केळी काळी पडणार नाहीत.
  • त्या कापांमध्ये दही, भाजलेले खोबरे आणि बदाम टाकून चांगले एकत्र करा.
  • अशाप्रकारे झटपट आणि रुचकर उपवासाचा रायता तुम्ही गार करून खाऊ शकता.

हेही वाचा :

Shravan Recipe : उपवासासाठी खास पनीर कटलेट रेसिपी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini