डोकं न दुखताही होऊ शकतो Migraine

डोकं न दुखताही होऊ शकतो Migraine

डोके दुखी सर्वसामान्य समस्या असून ती कोणालाही ही होऊ शकते. ज्यावेळी डोकं दुखते तेव्हा तुमची मानस चेहरा आणि कान ही काही प्रमाणात दुखतात. बहुतांश लोक जर त्यांचे डोक खुपचं दुखत असेल तर त्याला मायग्रेन असे समजतात. पण माइग्रेन ही एक गंभीर स्थिती आहे. यामध्ये असे होते की, रुग्णाचे डोकं दुखत नाही. काही लक्षण काही वेगळी असतात. ज्याला मेडिकल टर्ममध्ये साइलेंट मायग्रेन असे म्हटले जाते.

माइग्रेन शारिरीक समस्यांमध्ये सामान्य आहे. याच्या उपचाराठी रुग्ण न्युरोलॉजी विभागाशी संपर्क साधतात. मायग्रेनच्या समस्येमुळे कामावर त्याचा परिणाम होतो. जर्नल ऑफ हेडेक अॅन्ड पेन मध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चनुसार भारतीय लोकांमध्ये प्रत्येक वर्षी २५ टक्क्यांहून अधिक लोकांना ही समस्या होते. रिपोर्टनुसार १८-२५ टक्के महिलांना ही समस्या होत आहे. या समस्या एका असहाय्यनीय आजारांपैकी एक आहे.

सायलेंट मायग्रेन धोकादायक
ज्या रुग्णांना मायग्रेनची समस्या असते त्यांना प्रोड्रोमलच्या टप्प्यातून जावे लागते. या दरम्यान रुग्णाला थकवा, पोटासंबंधित समस्येसह अन्य समस्यांचा सुद्धा सामना करावा लागू शकतो. त्याचसोबत डोळ्यांची समस्या ही होऊ शकते. याचा परिणाम तुम्हाला समोरचे दिसण्यावरही होते.

एक ते तीन तास राहू शकते ही समस्या
३० टक्क्यांहून अधिक रुग्णांना अशा समस्यांचा सामना १५ ते ६० मिनिटांपर्यंत करावा लागतो. त्यानंतर उलटी, ऐकणे अथवा पाहण्याच्या समस्येसह अधिक डोकं दुखू लागते. बहुतांश वेळा यावेळचे दुखणे असहाय्य होते. त्यामुळे तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम होतो.

सायलेंट मायग्रेनवर उपचार
माइग्रेनवरील उपचार जसा केला जातो तसाच तो सायलेंट मायग्रेनवेळी ही होतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पॅरासिटामोल, नेप्रोक्सन सारखी औषध तुम्ही घेऊ शकता. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या अथवा कोणत्याही गोळ्या घेऊ नये.


हेही वाचा- खळखळून हसणं असू शकत Smiling Depression

First Published on: April 29, 2023 11:46 AM
Exit mobile version