Friday, May 17, 2024
घरमानिनीRecipeमहिलांसाठी खास Manini Tips

महिलांसाठी खास Manini Tips

Subscribe

दिवसभराची कामं करत असताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास होम टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

4 Whole Wheat Flour Options To Make Fluffy Rotis, Puri And More - NDTV Food

- Advertisement -
  • पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी कणीक मळताना तिच्यात थोडीशी तांदळाची पिठी घालून मळावी.
  • तूर डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरुन घातल्यास आमटीला छान आणि वेगळी चव येते.
  • पुलाव करताना तांदळाच्या दीडपट पाणी घालावे आणि २ शिट्ट्या कराव्यात यामुळे भात मोकळा होतो.
  • कांदा चिरताना डोळे झोंबतात, अशावेळी च्युईंगम खात कांदा चिरल्यास डोळ्यातून पाणी येणार नाही.
  • कपड्यांवरील शाईचे डाग घालवण्यासाठी डाग लागलेल्या ठिकाणी टुथपेस्ट लावावी. ती पूर्ण सुकू द्यावी. त्यानंतर ते कापड धुवावेत.

How to Hand Wash Clothes - Guide to Washing Clothes by Hand

  • ज्या कपड्याला च्युईंगम चिकटले आहे, ते एक तास फ्रिजमध्ये ठेवावे. त्यानंतर चिकटलेले च्युईंगम हाताने काढावे.
  • पाणी उकळताना भांड्यातून बाहेर येते, अशावेळी भांड्यावर लाकडी चमचा ठेवावा. उकळते पाणी बाहेर येणार नाही.
  • पांढरे कपडे धुताना लिंबाच्या रसाचा वापरा करावा. यामुळे पांढरे कपडे स्वच्छ राहण्यास मदत होते.
  • आरसा स्वच्छ राहण्यासाठी कापसावर स्पिरिट घेऊन त्यांनी आरसा पुसावा. यामुळे आरसा स्वच्छ होतो.
  • तुमच्या घरात उंदीर येत असतील तर त्यांच्या येण्याच्या वाटेवर लाल तिखट घाला यामुळे उंदीर येणे बंद होईल.

हेही वाचा :

Kitchen Tips : महिलांसाठी हटके टिप्स

- Advertisment -

Manini