घरलाईफस्टाईलकपल्ससाठी बेस्ट ट्रेवल डेस्टिनेशन

कपल्ससाठी बेस्ट ट्रेवल डेस्टिनेशन

Subscribe
रोजच्या धकाधकीच्या जीवनात कामाचा ताण आणि कुटुबांची काळजी यामुळे अनेक कपल्सना एकमेकांसाठी वेळ काढता येत नाही. अशाने त्यांच्या नात्यावर देखील त्याचा परिणाम होतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला काही दिवस एकमेकांना द्यायचे असतील एकमेकांसाठी वेळ काढायचा असेल तर तुम्ही दोघे कपल ट्रिप करू शकता.
तुम्ही आठवडाभर सुट्टी काढून फिरायला जाऊ शकता. जर तुम्हाला देशाबाहेर कुठेतरी लांब प्रवास करायचा असेल तर अशी अनेक ठिकाणे आहेत जी तुमचा मूड फ्रेश करतील. तिथे जाऊन तुम्ही तुमचा स्ट्रेस, टेन्शन विसरून जाल. किंवा तुमचे नुकतंच लग्न झाले असेल आणि तुम्हाला तुमच्या पार्टनरला हनीमूनचे सरप्राईझ द्यायचे असेल तर पुढील ठिकाणे तुमच्यासाठी बेस्ट आहेत.
बाली-
जर तुम्ही हनिमून डेस्टिनेशनच्या शोधत असाल तर बाली तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तेथील सुंदर दऱ्या तुम्हाला भुरळ घालतील. बालीच्या बीचवर तुम्ही एकेमेकांसोबत वेळ घालू शकाल. तसेच तुम्हाला तिथे पार्टनरसोबत रोमँटिक क्षण व्यतीत करता येतील. अशाने तुमच्यातील संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होतील. येथील जेवणही रुचकर आणि चविष्ट आहे. दरवर्षी येथे अनेक जोडपे भेट द्यायला येतात.
मालदीव –
बहुतेक जोडपी मालदीवला जातात. मालदीवला जाण्याचे स्वप्न असेल तर इथे एकदा तरी अवश्य भेट द्या. स्वर्गाहुनही सुंदर असे मालदीवचे सौंदर्य आहे असे येथे भेट देऊन गेलेलं कपल आवर्जून सांगतात. येथे तुम्हाला इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर बांधलेल्या छोट्या कॉटेज किंवा बीच हाऊसमध्ये एकत्र विश्रांतीचे क्षण घालवण्याची भरपूर संधी मिळेल. मालदीव आपल्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. हे एक उत्तम हनिमून डेस्टिनेशन आजतागायत ठरले आहे.
व्हिएतनाम –
व्हिएतनाम हा दक्षिणपूर्व आशियाई देश आहे, जो समुद्रकिनारे, नद्या, बौद्ध पॅगोडा इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. ज्या जोडप्यांना कमी पैशात पूर्ण मजा करायची आहे त्यांच्यासाठी व्हिएतनाम हा बेस्ट ऑप्शन आहे. इथे तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतील. येथे गेल्यास सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर तुम्ही एकमेकांसोबत रोमँटिक क्षण देखील घालवू शकाल.

22 beautiful places to visit in New Zealand | Faraway Worlds

न्यूझीलंड-
जर तुम्ही रोमँटिक डेस्टिनेशन शोधत असाल तर तुम्ही न्यूझीलंडलाही जाऊ शकता. नवविवाहित जोडप्यांसाठी हे एक उत्तम हनिमून डेस्टिनेशन देखील ठरू शकते. निळ्याशार समुद्रात आणि उंच पर्वतांमध्ये एकमेकांसोबत चालणे तुम्हाला रोमँटिक फील देईल.
मॉरिशस –
जर तुम्ही बाली, मालदीवला गेला असाल तर यावेळी मॉरिशसला जाण्याचा प्लॅन करा. तसेच तुमचं नुकतंच लग्न झालंय आणि तुम्ही हनीमूनचा प्लॅन करत असाल तर मॉरिशस हे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्यटन स्थळ असेल. असे म्हटले जाते की मॉरिशस हे पृथ्वीवरील सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. इथल्या सुंदर समुद्रकिना-यावर तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत हातात हात घालून चालणे तुम्हाला एक खास अनुभूती देईल. यासोबतच तुम्ही येथे येऊन तेथील खाद्यपदार्थ, संस्कृती आणि ठिकाणांचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.

 

- Advertisement -

हेही वाचा; ट्रिपनंतर बॅग ‘अनपॅक’ करायच्या सोप्या टिप्स

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -