Friday, May 10, 2024
घरमानिनीRelationshipमुलांना अशा प्रकारे लावा अभ्यासाची गोडी

मुलांना अशा प्रकारे लावा अभ्यासाची गोडी

Subscribe

बऱ्याच मुलांना अभ्यास करायचा कंटाळा येतो किंवा ते टाळाटाळ तरी करतात. अशावेळी, पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावते. सोबत मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावायची हा प्रश्न देखील भेडसावतो. तुमचेही मूल असे करत असेल तर ही बातमी पूर्ण वाचा.

अभ्यास करताना मुलांसोबत बसा –
मुलांना अभ्यास करताना प्रोत्साहित करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्याच्या बाजूला बसणे आणि त्याची स्तुती करणे. आपण जे काही करतो त्यामुळे आपली वाहवा होत आहे हे कोणत्याही मुलासाठी प्रेरणा असते. त्यामुळे जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी अभ्यासाला बसेल तेव्हा त्याच्यासोबत अभ्यासला बसा. याने तुमचे पाल्य मन लावून अभ्यास करू लागतील शिवाय तो कसा अभ्यास करत आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल.

- Advertisement -

प्रेशर देऊ नका-
दमदाटी करून अभ्यासाला बसविणे किंवा मुलांवर अभ्यासाचे प्रेशर दिल्याने मुलं अभ्यासापासून दूर जाऊ शकतात. तसेच मुलांच्या मनावर अपेक्षांचं ओझं तयार होते. आपण चांगले मार्क्स मिळविले नाही तर आई-बाबा आपल्याला ओरडतील किंवा मारतील अशी भीती मुलांच्या मनात तयार होते. मुलांना मानसिक दडपण येऊ लागते. परिणामी, मुलांचा अभ्यासातील रस वाढण्याऐवजी कमी होतो.

मुलं अभ्यास करत नाही, पालक म्हणून काय करावे? 'अशी' लावा अभ्यासाची गोडी | Kids Dont Like To Study Then Try These Tips They Will Love Study And They Will Study Themselves

- Advertisement -

मुलांची इतरांशी तुलना करू नका –
अनेक पालक मुलांच्या मार्क्सवरून मुलांची इतर मुलांशी तुलना करतात. ज्याचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. शिवाय त्याचा परिणाम असाही दिसून येतो की, मूल अभ्यासातून माघार घेऊ लागते. त्यामुळे पालकांनी तुमच्या मुलांची तुलना इतर कोणाशीही करू नये. त्याऐवजी, तुम्ही दुसऱ्याचे उदाहरण देऊन त्यांना प्रेरित करू शकता.

मुलांचीही बाजू समजून घ्या –
कधीही मुलांवर आपलं बोलणे थोपवू नका. त्यांचं म्हणणं सुद्धा ऐका. कधी कधी मुलांना खरंच अभ्यास करायचा कंटाळा येत असेल तर अशावेळी दमदाटी करून, मारून मुलांना अभ्यासाला बसविण्यात काहीच अर्थ नाही कारण जबरदस्तीने मुलांना अभ्यासाला बसविल्याने तो जो अभ्यास करेल तो त्याच्या लक्षात राहणार नाही. त्यामुळे कधी मुलांना कंटाळा आला तर काही वेळ त्याला त्याच्या आवडीची गोष्ट करू द्या आणि काही वेळाने पुन्हा अभ्यासाला बसावा.

तुमच्या मुलाची लक्षात ठेवण्याची क्षमता समजून घ्या-
तुमच्या पाल्याची समजून घेण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता समजून घेण्याचा प्रयन्त करा. त्यानुसार मुलांचा अभ्यास घ्या.

 


हेही वाचा ;  सेक्शुअल हेल्थवर पालकांनीच साधावा मुलांशी संवाद

 

- Advertisment -

Manini