घरलाईफस्टाईलमुलांचा Study Room असा असावा

मुलांचा Study Room असा असावा

Subscribe

मुलं ही खोडकर असतात त्यामुळे त्यांना सतत खेळायला आवडते. अशातच ते अभ्यास कमी आणि खेळण्यातच अधिक वेळ घालवतात. मात्र जर त्यांचे अभ्यासात मन लागत नसेल तर यामध्ये त्यांची काही चुक नाही. सर्वसामान्यपणे पालकांना असे वाटत राहते की, मुलं खोडकर असल्याने त्याला अभ्यासाचा कंटाळा येतो. त्यामुळे त्याला दमदाटीने अभ्यासाला बसवले जाते. मात्र मुलांसोबत असे करणे योग्य नाही. यामुळे मुलं बिघडतात आणि तुमचे त्यांच्यासोबतचे नाते ही बिघडले जाते. (Study room of child)

पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की, जर मुलाचे मन अभ्यासात लागत नसेल तर त्यामागील नेमकी कारण काय आहेत. त्यामधील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील वातावरण. जर मुलासाठी तुम्ही स्टडी रुम तयार केली असेल तर तेथे काही गोष्टी लक्षात घेऊन इंटिरियर करावे. परंतु तुम्ही कधी रंगांच्या साइकॉलोजीबद्दल ऐकले आहे का? याचा सुद्धा मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो.

- Advertisement -

हिरवा रंग- एकाग्रता वाढवतो


लो वेवलेंथ असणारे रंग एकाग्रता वाढवण्याचे काम करतात. यामुळे मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढवायची असेल तर त्याच्या स्टडी रुमला तुम्ही हिरव्या रंगाच्या शेड्स मधील एखादा रंग लावू शकता.

- Advertisement -

केशरी रंग- मूड बूस्टर


केशरी रंग हा विद्यार्थ्यांसाठी फार उत्तम मानला जातो. कारण त्यांच्या मूडला बूस्ट करण्यासह, आराम आणि न्युरो फंक्शनला उत्तम बनवण्यासाठी काम करतो. काही तज्ञ असे म्हणतात की, वातावरणात हा रंग असेल तर मेंदूला ऑक्सिजन व्यवस्थितीत मिळू शकते, जो मानसिक हालचालींना उत्तेजित करतो. त्यामुळे व्यक्तीचा मेंदू काम करण्यासाठी पूर्णपणे तयार होतो.

अशातच तुमच्या मुलाला होमवर्क करण्यास समस्या येत असेल तर त्याच्या रुमला तुम्ही हा रंग लावू शकता. मात्र लक्षात ठेवा की, केशरी रंगाची लाइट शेड यावेळी वापरला.

निळा रंग- प्रोडक्टिव्हिटी


काही संशोधनातून असे समोर आले आहे की, ज्या लोाकांना आपल्या कामात अधिक डोकं लावावं लागत नाहीत ती लोक निळ्या रंगाच्या वातावरणात अधिक प्रोडक्टिव्ह असतात. हा रंग कठीण गोष्टींना शिकण्यास मदत करतो. अशातच तुम्ही तुमच्या मुलाच्या स्टडी रुमला या निळा रंग लावू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -