Monday, April 29, 2024
घरमानिनी'या' राशीच्या व्यक्तींनी कधीही हाताला किंवा पायाला काळा धागा बांधू नये

‘या’ राशीच्या व्यक्तींनी कधीही हाताला किंवा पायाला काळा धागा बांधू नये

Subscribe

ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंग हा सगळ्यांसाठीच शुभ नसतो. यामुळे उलट त्याचे वाईट परिणाम होतात.

नकारात्मक शक्तींपासून संरक्षण व्हावे, नजर लागू नये म्हणून बरेचजण हाताला किंवा पायाला काळा धागा ( Black Thread) बांधतात. हल्ली काळ्या धाग्यात गुंफलेले ईविल आयचे लॉकेटही बाजारात उपलब्ध झाले आहे. पण ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंग हा सगळ्यांसाठीच शुभ नसतो. यामुळे उलट त्याचे वाईट परिणाम होतात. त्यासाठी कोणत्या राशींसाठी काळा रंग शुभ – अशुभ आहे हे माहित करून घ्यायला हवे.

ज्योतिषशास्त्रानुसार दोन राशींच्या व्यक्तींनी कधीही काळ्या रंगाचे कपडेच नाही तर धागेही हाता पायाला बांधू नयेत. त्या राशी आहेत मेष आणि वृश्चिक. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्याने तो आगीचा प्रतिक आहे आणि त्याचा रंग लाल आहे.

- Advertisement -

तर वृश्चिक राशीचा स्वामीही मंगळ असून लाल रंगाचा आहे. मंगळाचे काळ्या रंगाशी शत्रुत्व आहे असे म्हटले जाते. यामुळे या राशींवर त्याचे नकारात्मक परिणाम होतात. जर या राशींच्या व्यक्तींनी काळा धागा बांधला तर त्यांना आर्थिक हानीबरोबरच मान हानि आणि आरोग्यविषयी समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच कुटुंबातही अशांतता निर्माण होते.

- Advertisement -

पण त्याचबरोबर ज्या व्यक्ती काळा धागा बांधू शकतात त्यांनाही काही नियम पाळणे गरजेचे आहे.

काळा धागा बांधण्यासाठी सर्वात शुभ दिवस आहे शनिवार. यामुळे जर तुम्हांलाही हाताला किंवा पायाला काळा धागा बांधायचा असेल तर तो शनिवारीच बांधावा.

तसेच ज्या हातात काळा धागा बांधला असेल त्या हातात दुसऱ्या कुठल्याही रंगाचा धागा बांधू नये.

तसेच जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबापैकी एखादी व्यक्ती सतत आजार पडत असेल तर हनुमानाच्या पायाजवळील शेंदूर लावलेला काळा धागा संबंधित व्यक्तीच्या गळ्यात शनिवारी घालावा.

 

 

- Advertisment -

Manini